रोटरी क्लबकडून ''प्लास्टिकमुक्त''चा संदेश
swt25.jpg
88842
कुडाळः रोटरी क्लबने बाजारपेठेत व कुडाळ बसस्थानक परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून ‘प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक जीवनशैली’चा संदेश दिला. (छायाचित्रः अजय सावंत)
रोटरी क्लबकडून ‘प्लास्टिकमुक्त’चा संदेश
कुडाळमध्ये लोकजागृतीः नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकजागृती यांचेही उत्तम माध्यम ठरू शकतो, याचे प्रत्यंतर रोटरी क्लब ऑफ कुडाळने दिले. येथील बाजारपेठ तसेच कुडाळ बसस्थानक परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दोनशे कापडी पिशव्यांचे वाटप करून ‘प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक जीवनशैली’चा संदेश देण्यात आला.
आज प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण ही गंभीर समस्या ठरत आहे. बाजारपेठा, बसस्थानके व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. त्याचा थेट परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर, पाण्याच्या प्रवाहावर व पशुपक्ष्यांच्या आरोग्यावर होत असतो. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कुडाळने नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक पर्यायांची जाणीव निर्माण करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला. कापडी पिशवी ही टिकाऊ, पुनर्वापर करता येणारी व पर्यावरणासाठी सुरक्षित अशी असल्याने नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला.
या पिशव्या तयार करण्यासाठी आकार फाउंडेशन, सोमदत्त प्लास्टिक, हॉटेल स्पाईस कोकण, क्रांती सिरॅमिक्स या स्थानिक संस्था व व्यावसायिकांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या वेळी कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव पवार, क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, अॅड. राजीव बिले, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, नीता गोवेकर, रवींद्र परब, आनंद वेंगुर्लेकर, शशिकांत चव्हाण, शिल्पा पवार, डॉ. योगेश नवांगुळ यांच्यासह अनेक रोटरी सदस्य तसेच लायन्स क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष अॅड. समीर कुळकर्णी, डॉ. सुशांता कुळकर्णी उपस्थित होते. बाजारपेठेतील व्यापारी, ग्राहक तसेच बसस्थानक परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. नागरिकांनी रोटरी क्लबचे आभार मानले. आगामी काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातील, असे आश्वासन अध्यक्ष पवार यांनी यावेळी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.