चेसीसचे टायर सहा तास हाताने वळवत मिरवणूक

चेसीसचे टायर सहा तास हाताने वळवत मिरवणूक

Published on

- rat२p२.jpg-
P२५N८८८५७
रमेश गजानन जोशी
- rat२p३.jpg-
२५N८८८५८
किशोर यशवंत जोशी.

टिळक आळी गणेशोत्सव शताब्दी---लोगो

‘चेसीस’चे टायर सहा तास हाताने वळवत मिरवणूक
२३ वर्षापूर्वीची घटना ; रमेश आणि किशोर जोशींचा भीमपराक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः पारावरच्या गणपतीच्या २००२ च्या विसर्जन मिरवणुकीत जुनी चेसीस वापरावी लागली होती. त्याला नव्याने स्टेरिंग हँडल बसवले होते. त्याला नाइलाज होता, मात्र आयत्यावेळी ते स्टेरिंग तुटले. तशीच गाडी न्यायची किंवा बदलायची दोन्ही शक्य नव्हते. अशा वेळी दोन तरुण पुढे आले. टायर मागे ते बसले आणि पठ्ठ्यानी हाताने टायर वळवले. सुमारे सहा तास मिरवणूक निघाली. परत येतानाही गाडी तशीच आणावी लागली. रमेश जोशी आणि किशोर जोशी हे ते तरुण. गजाननाच्या प्रेरणेने आणि श्रद्धेने असे भक्त उभे राहतात आणि म्हणूनच शतकाचा उत्सव अखंडपणे सुरू राहतो.
ही आठवण सांगताना उल्हास शेवडे म्हणाले, १५ सप्टेंबर २००२ (रविवार). गणेश अन् गणपती उत्सवात भक्त कसे रममाण होत आणि तन, मन अर्पून कसे काम करत याचा अविस्मरणीय अनुभव त्या दिवशी रत्नागिरीने घेतला. गणेश उत्सव अर्थात पारावरचा.
पूर्वी अनेकदा गजाननाच्या विसर्जनासाठी नवनवीन गाड्या मिळत असत, पण त्या दिवशी परिस्थिती वेगळी होती. त्या दिवशी समुद्रावर मिरवणुकीसाठी जुनीच चेसीस होती, पण तिला नव्याने स्टिअरिंग कम हँडल लावून एका ‘रथा’चे रूप दिले होते. प्रथेप्रमाणे सर्व देखावा मोठ्या आदराने त्यावर आरूढ झाला. श्री गजाननदेखील आपल्या सिंहासनासह दिमाखात विराजमान झाले आणि मिरवणुकीला सुरुवात होणार, इतक्यात नियतीचा खेळ सुरू झाला. नवीन बसवलेले स्टिअरिंग कम हँडल अकस्मात तुटले! वेळ वेगाने सरकत होता. लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, पण स्टिअरिंग नसलेल्या गाडीवरून मिरवणूक काढणे केवळ अशक्य होते. दुसरी गाडी पाहावी तर किमान पुढील तीन तास वाया जाणार होते. अशा बिकट प्रसंगी, एक तरुण चक्क गाडीच्या चाकाजवळ, मागील भागात बसला आणि स्टिअरिंगचे काम चक्क हाताने टायर वळवून केले! रथ पुढे सरकू लागला आणि त्याच्या पाठोपाठ दुसरा तरुणही त्याच पद्धतीने त्या रथामध्ये जाऊन बसला. घामाघूम अवस्थेत, पाठीला, पोटाला, हातांना, पायांना होणाऱ्या इजा-दुखापतींची जराही पर्वा न करता, पुढील सहा तास त्यांनी रथ आवश्यकतेनुसार वळवला. केवळ गणरायाच्या विसर्जनाचा ध्यास मनात होता.
मिरवणूक अखेर समुद्रावर पोहोचली आणि श्रींचे विधिपूर्वक विसर्जन झाले. परत रथ देवळात आणण्यासाठीही तीच युक्ती वापरली आणि तो मंदिरात सुखरूप आला. सगळे जण सुखाने आपापल्या घरी परतले. हे इतके कष्ट सहन करून त्या श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीत समुद्रापर्यंत नेणारे तरुण म्हणजे रमेश जोशी आणि दुसरा किशोर जोशी. इतक्या त्रासातून केवळ आपला गणपती समुद्रात विसर्जित व्हावा यासाठी हे दोघे तरुण एका ध्येयापोटी, आपल्या शरीराला कष्ट देत होते. निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती याचे हे अविस्मरणीय उदाहरण आहे.

कोट
आपल्या लाडक्या किशोरच्या आठवणींना उजाळा देत, या घटनेतून पुढील अनेक पिढ्यांपर्यंत काही मूल्यांचे संक्रमण व्हावे. ही एका अतूट श्रद्धेची, त्यागाची आणि भक्तीची गाथा आहे.
- उल्हास शेवडे, टिळक आळी, रत्नागिरी
-----
चौकट
वाहनांची चांगली माहिती
किशोर जोशी हा टिळकाळातील वाय. डी. जोशी यांचा मोठा मुलगा. तो मूकबधिर होता परंतु त्याला वाहनांमधील तंत्रज्ञान चांगले अवगत होते आणि इतरही तांत्रिक बाबींची त्याला चटकन माहिती होत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com