आंबा घाटाला पर्यायी मार्ग

आंबा घाटाला पर्यायी मार्ग
Published on

-rat२p८.jpg-
२५N८८९०६
राजापूर ः अणुस्कुरा घाटमार्ग
------
अणुस्कुरा घाट-विकासवाट--मालिका भाग २----लोगो

आपत्कालात अणुस्कुरा घाटाचाच आधार
आंबा घाटाला पर्यायी मार्ग ; तीन तालुक्यांना फायदा
राजेंद्र बाईत ः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ : अतिवृष्टीमध्ये २०२१ साली दरडी कोसळून आंबा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्या वेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येण्यासाठी राजापूर तालुक्यातून जाणारा अणुस्कुरा घाटमार्ग हा एकमेव पर्यायी मार्ग होता. त्या काळात खऱ्‍या अर्थाने पश्‍चिम महाराष्ट्राला जोडण्याच्यादृष्टीने अणुस्कुरा घाटाचे महत्व अधोरेखित झाले होते. आंबा घाटमार्ग बंद असल्याने कोल्हापूर भागातील बाजारपेठेतून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणारी सर्व मालाची आवक आणि प्रवासी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गातून सुरू होती.
रत्नागिरी जिल्ह्याला किराणामाल-भाजीपालासह अन्य विविध साहित्यासाठी नजीकच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील घाऊक बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातून जाणाऱ्‍या आंबा घाटमार्गानंतर राजापूर तालुक्यातून जात असलेल्या अणुस्कुरा घाटमार्गामुळे रत्नागिरी जिल्ह्याला पश्‍चिम महाराष्ट्रातील घाऊक बाजारपेठ खुली झाली आहे. या बाजारपेठेतून दरदिवशी विविध मालाची दरदिवशी जिल्ह्यामध्ये येथील व्यापाऱ्यांकडून आवक केली जात आहे. आंबाघाट असो वा अणुस्कुरा घाट, या घाटमार्गामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला रत्नागिरी जिल्ह्याला जोडणे अधिक सोयीचे अन् सुलभ झाले आहे. कोल्हापूरसह घाटमाथा परिसर जवळ असल्याने तेथील मोठ्या बाजारपेठेतून घाऊक प्रमाणात किराणा माल, विविध कडधान्य, कापड दुकानातील साहित्य, बांधकामासाठी लागणारे साहित्य यांसह अन्य साहित्याची राजापूर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. दुधासह भाजीपालाही मोठ्या प्रमाणात कोल्हापूर भागातून येतो. अणुस्कुरा घाटमार्ग बंद झाल्यास अणुस्कुरा घाटरस्त्याऐवजी राजापूर तालुक्यात येण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे कोल्हापूर भागातून राजापूरमध्ये वस्तू वा साहित्य येण्यामध्ये फारसे अडथळे येत नाहीत.

(क्रमशः)
---
दृष्टिक्षेपात
कोल्हापूरची घाऊक बाजारपेठ खुली
जिल्ह्यात रोज लाखोंच्या मालाची आवक
अणुस्कुरा बंद झाल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध
-----
चौकट
पर्यायी मार्ग वेळखाऊ आणि खर्चिक
अणुस्कुरा घाट बंद झाल्यास राजापूर-ओणी-पाचल-तळवडे-मूर-नेर्ले-तिरवडे-भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर या पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात आहे. पाचल-अणुस्कुरा-कोल्हापूर हे अंतर ७० किमी. पाचल-भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर हे नव्वद किमी अंतर होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना पाचल-भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर असा सुमारे वीस किमीचा जादा प्रवास करावा लागत असल्याने पर्यायी मार्गाचा प्रवास वेळ आणि पैशाच्यादृष्टीने वाहनचालकांसाठी खर्चिक ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com