सेवा पंधरवडा १७ पासून

सेवा पंधरवडा १७ पासून

Published on

सेवा पंधरवडा
१७ सप्टेंबरपासून
रत्नागिरी ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राज्यात साजरा केला जाणार आहे. महसूल मंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सेवा पंधरवड्यात राबवायचे उपक्रम हे यापूर्वीपासून राबविण्यात येत असून पंधरवड्यादरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे उपक्रम आहेत.

नियुक्तीपत्राशिवाय
गृहोपयोगी संच नाही
रत्नागिरी ः मंडळाचे गृहोपयोगी वस्तू संच वितरणाचे http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाचा वापर करुन गृहोपयोगी संच घेण्यासाठी त्याच्या सोईचा दिनांक व तालुकानिहाय वितरण केंद्र निवडण्यात यावा. तसेच संकेतस्थळावरुन नियुक्ती पत्र घेण्यात यावे. नियुक्ती पत्राशिवाय वितरण केंद्रावरुन कोणालाही संच वाटप होणार नाही, असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे. गृहपयोगी वस्तू संच वितरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती, या कार्यपद्धतीमध्ये बदल करून सुधारित कार्यपद्धतीस शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. गृहपयोगी संच वितरणाबाबत सूचना देण्यात येत आहेत. गृहोपयोगी संच हा कुटुंबासाठी (पती/पत्नी) एकच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच संबंधित कामगाराने यापूर्वीच गृहोपयोगी संच घेतला असेल तर कामगार या योजनेस अपात्र ठरेल. मंडळाचे गृहपयोगी वस्तू संच वितरणाचे http:/hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाचा वापर करून गृहोपयोगी संच घेण्याकरीता त्याच्या सोईचा दिनांक व तालुकानिहाय वितरण केंद्र निवडण्यात यावा. तसेच संकेतस्थळावरुन नियुक्ती पत्र घेण्यात यावे. बांधकाम कामगार मंडळाचे ओळखपत्र, आधारकार्ड व संकेतस्थळावरून मिळालेले नियुक्ती पत्र घेवून त्याने निवडलेल्या दिनांकास वितरण केंद्रावर उपस्थित राहून तिथे बायोमेट्रिक व ऑनलाईन फोटो देऊन गृहोपयोगी संच ताब्यात घेवून पोहोच द्यावी. दर शनिवार व रविवार व शासकीय सुट्या वगळून संच वाटप करण्यात येईल.


निराधार योजनेसाठी
समितीची स्थापना
रत्नागिरी ः संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत प्राप्त होणारे अर्ज छाननी करुन निर्णय घेण्यासाठी रत्नागिरी तालुका पातळी संजय गांधी निराधार समिती स्थापन करण्यात आली आहे. पालकमंत्री यांनी शिफारस केलेली संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती स्वप्नील मयेकर (कोतवडे) हे या समितीचे अध्यक्ष असून मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी सुनील जाधव (वाटद), महिला अशासकीय प्रतिनिधी अपर्णा बोरकर (पानवल), इतर मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी नामदेव चौघुले (गडनरळ), रुपेश पेडणेकर (शिवाजीनगर), सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी मिलिंद खानविलकर (उक्षी), अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी श्रीकांत राऊत (पाली), तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी सुशांत पाटकर (दाभिळ आंबेरे), सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी प्रतीक देसाई (जाकादेवी), ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी राजेश साळवी (मालगुंड), पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सदस्य असून नायब तहसीलदार समितीचे सदस्य सचिव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com