आचरा हिर्लेवाडी रस्त्याची दुरवस्था

आचरा हिर्लेवाडी रस्त्याची दुरवस्था

Published on

swt210.jpg
88931
आचरा ः हिर्लेवाडी रस्त्याचे खड्डे बुजवण्याची मागणी करणारे हिर्लेवाडी ग्रामस्थांनी दिले

आचरा हिर्लेवाडी रस्त्याची दुरवस्था
ग्रामस्थांकडून प्रशासनास जाब ः चार दिवसांत डागडुजीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २ ः आचरा हिर्लेवाडी मुख्य रस्ता ते खोतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चलवणे, पादचाऱ्यांना चालत जाणे धोक्याचे बनले आहे. वारंवार मागणी करूनही खड्डे बुजवले गेले नसल्याने हिर्लेवाडी ग्रामस्थांनी आचरा ग्रामपंचायतीत धडक देत जाब विचारला. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी येत्या चार दिवसांत ग्रामपंचायतीमार्फत खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन दिले.
हिर्लेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग वायंगणकर, सचिव लऊ मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आचरा ग्रामपंचायतीमध्ये दाखल झाले. यावेळी हिर्लेवाडी विभागाचे ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, सारिका तांडेल उपस्थित होत्या. यावेळी ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन सरपंच फर्नांडीस यांना दिले.
ग्रामस्थांनी अर्धवट राहिलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच विविध मागण्यांसह ठेकेदारांनी अपूर्ण ठेवलेल्या कामांकडे लक्ष वेधले. हिर्लेवाडी मुख्य रस्ता ते खोतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे चालणेही धोकादायक बनले आहे. जल जीवन नळपाणी योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. या योजनेसाठी रस्त्यानजीक केलेल्या खोदाईमुळे रस्त्याची बाजूपट्टी धोकादायक बनली असून वाहने त्यात अडकून पडत आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. गणपती साना अपूर्ण अवस्थेत असल्याने विसर्जनावेळी गणेशभक्तांची गैरसोय होत आहे. वाडीतील पथदीपांचा प्रश्न सातत्याने उद्भवत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी सरपंच फर्नांडीस यांनी, रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरच भरून घेतले जातील. जी कामे अपूर्ण आहेत, ती संबंधित ठेकेदाराला समज देऊन चार दिवसांत पूर्ण करून घेतली जातील, असे आश्वासन दिले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com