चाकरमान्यांच्या परतीसाठी सुटल्या २२१ एसटी बसेस

चाकरमान्यांच्या परतीसाठी सुटल्या २२१ एसटी बसेस

Published on

चाकरमान्यांच्या परतीसाठी २२१ बसेस
विभाग नियंत्रक बोरसे ः ग्रुप बुकिंगला मोठा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या गणेशभक्त चाकरमान्यांच्या परतीसाठी आज गणपती विसर्जनानंतर संध्याकाळनंतर तब्बल २२१ एसटी बसेस फेऱ्या मुंबईकडे रवाना झाल्या. जिल्ह्यात ग्रुप बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळाला असून जवळपास ७८४ बसेसचे ग्रुप बुकिंग झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीने सुरक्षितता बाळगली आहे. आतापर्यंत २१३९ बसेसचे आरक्षण पूर्ण झाले असून त्यात वाढ होईल. आतापर्यंत १३५५ बसेस आरक्षित असून ७८४ बसेसचे ग्रुप बुकिंग झाले आहे. ३ सप्टेंबरला ११११, ४ ला ५९२, ५ सप्टेंबरला १०४, ६ रोजी ५७ व ७ रोजी ५४ एसटी बसेस रत्नागिरी विभागातून सोडण्यात येणार आहेत. एसटीचे तिकीट काढले नाही त्यांनी ऑनलाइन बुकिंग करावे. आजपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून उद्या सर्वाधिक १ हजार १११ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे एसटीची वाहतूक सुरक्षितरित्या होण्याकरिता सर्व चालक, वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊस, खड्डेमय रस्त्यांमुळे काही वेळा प्रवासाला उशिर होत आहे. परंतु सर्व प्रवाशांचा प्रवास काळजीपूर्वक होण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

चौकट १
आगाराचे नाव* आरक्षित* ग्रुप बुकिंग* एकूण
मंडणगड* ६८* ५०* ११८
दापोली* १७२* २३* १९५
खेड* २९९* २७* ३२६
चिपळूण* २०५* ६१* २६६
गुहागर* ७३* ३०२* ३७५
देवरुख* १७८* १३२* ३१०
रत्नागिरी* १५७* ३१* १८८
लांजा* १०२* ६६* १९३
राजापूर* १०१* ९२* १९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com