''ओबीसी''त ''मराठा''चा समावेश नको

''ओबीसी''त ''मराठा''चा समावेश नको

Published on

swt214.jpg
88936
सिंधुदुर्गनगरी ः येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना ओबीसी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

‘ओबीसी’त ‘मराठा’चा समावेश नको
सिंधुदुर्गात मागणीः जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ः जिल्ह्यातील ओबीसी समाजाने २७ टक्के ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये, अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘संविधानाने दिलेल्या २७ टक्के ओबीसी आरक्षणामध्ये सध्या ३६४ पेक्षा जास्त सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जातींचा समावेश आहे. मात्र, कालेलकर आयोग, मंडल आयोग, रेंढे आयोग, तसेच राज्य शासनाने नेमलेल्या मुटीतकर समिती, बी. डी. देशमुख समिती, खत्री आयोग व बापट आयोग यांच्या अहवालांनुसार मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात मोडत नाही, हे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. शासनाकडून मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असताना, फक्त ओबीसी आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मराठा समाज हा पुढारलेला असल्याने त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास खऱ्या अर्थाने सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ओबीसी समाजाच्या जातींची अधिकच उपेक्षा होईल.’
आज जिल्हाधिकारी धोडमिसे यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. यावेळी समता परिषद रत्नागिरी-सिंधुदुर्गचे समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हेमंत (काका) कुडाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद मेस्त्री यांच्यासह सुनील भोगटे, रमण वायंगणकर, जगदीश चव्हाण, कृष्णा पंधारे,सदानंद अनावकर, चंद्रकांत कुंभार, अतुल बंगे, शेखर गवंडे आदी उपस्थित होते.

चौकट
...तर आंदोलन उभारु
श्री. जरांगे यांच्या मागणीनुसार शासनाने निर्णय घेतल्यास या निर्णयाविरोधात समस्त ओबीसी समाजाला उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही या संघटनांनी शासनाला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com