एकदिवशीय गौरी पूजन सोहळा वेंगुर्लेत उत्साहात
swt216.jpg
88944
मातोंडः पाणवठ्यावरून गौरी आणताना गावठणवाडी येथील परब, मेस्त्री कुटुंबीय.
एकदिवशीय गौरी पूजन
सोहळा वेंगुर्लेत उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ः तालुक्यात आज ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा ११ खडे आणून एकदिवशीय गौरीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ओवसण्याचा कार्यक्रमही उत्साहात झाला. माहेरवाशिण म्हणून असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या बसविल्या जातात.
काही कुटुंबांत गौरीचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन खडे आणून त्याची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ आदींपैकी एक-दोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवून त्यांची पूजा केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गौराईचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या परंपरेनुसार तीन, दोन किंवा एक दिवसांसाठी हा गौराईचा सण साजरा करण्यात येतो. आज सकाळी एकदिवशीय गौराई आणण्यात आल्या. यानंतर महिलांनी आपापल्या परंपरेनुसार ओवसा भरण्याची प्रथा झाली. महिलांनी पारंपरिक साड्या परिधान करून गौरी गणपतीकडे ओवसे भरून सुख-समृध्दीचे साकडे घातले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.