माळरानावर रानफुलांची मुक्त उधळण
swt32.jpg ते swt34.jpg
89207, 89209
देवगडः तालुक्याच्या सडा भागात निसर्गाची मुक्त उधळण सुरू आहे. विविध आकारातील, रंगातील फुले लक्षवेधी ठरत आहेत.
माळरानावर रानफुलांची रंगीबेरंगी मुक्त उधळण
निसर्गाचा बहर ः डोळ्यात सौंदर्य साठवण्यासाठी निसर्गप्रेमींची धडपड
संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः पावसाळ्यातील निसर्गाचे बहरणे सुरू झाले असून याचा प्रत्यय सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. विविध ठिकाणच्या मोकळ्या माळरानावर तसेच वनस्पती उगवत असलेल्या दाट जागांमध्ये विविध आकार आणि रंगातील फुलांची मुक्त उधळण सुरू आहे. निसर्गाचे अलौकिक सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी निसर्गप्रेमींची सध्या धडपड सुरू असते. निसर्गाचे पावसाळी अलौकिक रुप अनेकांना भुरळ घालते.
कोकण म्हटले की, निसर्गाची देणगीच जणू. पश्चिम भागात विस्तारलेला अरबी समुद्र तर सह्याद्रीच्या हिरव्या शाली पांघरलेल्या विस्तीर्ण डोंगररांगा पावसात अधिकच खुलून दिसतात. कोकणचे अनेकांकडून कवितांमधून वर्णन केले गेले आहे. पावसाळ्यात मोकळ्या जागेत रान जागोजागी उगवते; मात्र काही रानटी झाडे, वेली, फुले निसर्गाच्या सौंदर्यात सध्या भर घालताना दिसत आहेत. पावसाळा सुरू होऊन श्रावण महिना आला की निसर्गाचे बहरणे सुरू होते. रंगीबेरंगी वनस्पती, फुले या काळात आपल्या दृष्टीस पडतात. गणेशोत्सवात सर्वदूर लहान पिवळ्या फुलांची चादर पसरते. ग्रामीण भागात याला ‘हरणाची फुले’ असेही संबोधतात. सध्या विविध आकारातील, रंगातील फुले दिसत आहेत. शिवाय विविध रानटी फळे यावेळी दृष्टीस पडतात. एकेकाळी गणेशोत्सवातील सजावटीसाठी विविध प्रकारातील आरासाचे साहित्य उपलब्ध होण्याआधी निसर्गाच्या या फुलांचीच आरास केली जात असे. माटवी सजावटीसाठी खास करून हीच आरास असे. आजही याचा वापर केला जातो. एकेकाळी ग्रामीण भागात पावसाळ्यात खाण्यासाठी रानभाज्यांचा वापर केला जात असे. अलीकडच्या काळात नव्या पिढीला या पावसाळी रानभाज्यांची ओळख होण्यासाठी, त्यातील औषधी गुणधर्म कळण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने आरोग्याला होणारे लाभ समजण्यासाठी शाळांमधून रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाण्याचा उपक्रम घेतला जातो. पावसाळ्यात निसर्गाचे बहरणे अनेकांना खुणावत असते. यातूनच विविध औषधी वनस्पती, खाण्याच्या वनस्पती, उपयोगात असलेली झाडे याचा अभ्यास सुरू असतो. आयुर्वेदाला अनेक वर्षांची जुनी परंपरा आहे. याच निसर्गात औषधी गुणधर्म धारण केलेल्या वनस्पती आढळतात. विविध झाडे, गवताळ वनस्पती, रानटी फळे, फुले यांचा अभ्यास निगर्सप्रेमींकडून केला जातो. सध्या ग्रामीण भागात निसर्गाचे सौंदर्य बहरले असून विविध फुले डोलत आहेत. निसर्गाचे हे अनोखे रुप सर्वसामान्यांना खुणावत असते.
चौकट
संवर्धनाची गरज
एरव्ही मोकळे दिसणारे माळरान पावसाळ्यात विविध आकारातील, रंगातील फुलांनी बहरलेले असतात. यामध्ये दुर्मीळ वनस्पतींचाही समावेश असतो. या बहरण्याने विविध आकारातील पक्षी, कीटक, बेडूक तसेच साप यांची एक अन्नसाखळी तयार झालेली असते. अशा मोकळ्या जागांमुळे निसर्गाचे एक अनोखे सौंदर्य चटकन दृष्टीस पडते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा संवर्धन आणि जतन करण्याची आवश्यकता आहे.
कोट
89206
पावसाळ्यात निसर्गाचे वेगळेपण जाणवते. सध्या निसर्ग सर्वदूर बहरला आहे. विविध आकारातील, रंगातील फुले डोलत आहेत. कोकणात विविधांगी रानटी झाडे, औषधी वनस्पती, विविध उपयोगी झाडे दृष्टीस पडतात. काही भागात गवताळ वनस्पती आढळतात. दुर्मीळ वनस्पती पावसाळ्यात दिसतात. याचवेळी विविध फुलपाखरे, कीटक व बेडूक आढळतात. ही निसर्गाची अन्नसाखळी आहे. निसर्गाचा हा ठेवा जतन करण्याची आवश्यकता आहे. मोकळ्या जागा सच्छिद्र असल्याने जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया यातून चालते. निसर्गाचा अभ्यास नेहमीच सुरू असतो.
- नागेश दप्तरदार, निसर्ग अभ्यासक, देवगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.