भर समुद्रात अवतरला ''चैतन्योत्सव''

भर समुद्रात अवतरला ''चैतन्योत्सव''

Published on

swt316.jpg
89228
फ्रान्स ः येथील समुद्रात जहाजावर मराठी बांधवानी श्री गणेशाची स्थापना केली आहे.

swt317.jpg
89229
फ्रान्स ः श्री गणेशाच्या पूजेप्रसंगी दीपक नाईक व सहकारी.

भर समुद्रात अवतरला ‘चैतन्योत्सव’
गणरायाचरणी लीनः फ्रान्समधील सागरात मराठी माणसाचा उत्सव
नीलेश मोरजकरः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण आहे. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असतील तिथे हा सण भक्तीभावानी साजरा करतात. गणपतीची ओढ ही सातासमुद्रपार असून जमिनीपासून हजारो किलोमीटर आत फ्रान्सच्या समुद्रात असलेल्या बोटीवर मराठी माणसाने एकत्रित गणेशोत्सव साजरा केला आहे. विशेष म्हणजे हे उत्सवाचे पंचवीसावे रौप्य महोत्सवी वर्ष असून जहाजावर असणारे देश विदेशातील हजारो भाविक श्री गणराया चरणी लीन होत आहेत.
या गणेश उत्सवात विविध गणेश भक्तांच्या माध्यमातून गोळा होणारे लाखो रुपये भारतातील अनाथ मुलांच्या शिक्षण व आरोग्यावर खर्च करण्यात येतात. गणेशोत्सवाच्या काळात हे जहाज फ्रान्समधील समुद्रात असून या जहाजावर मराठी माणसे आपापल्या वेगवेगळ्या हुद्द्यावर काम करत आहेत. या मराठी तरुणांनी गणेशोत्सव सणानिमित्त एकत्र येऊन उत्साह पूर्ण वातावरणात बोटीवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश उत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी विशेष देखावा देखील उभारला आहे. बोटीवर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर नित्य पूजा अर्चा करताना आरती गाताना देश विदेशातील सर्व पर्यटक व गणेश भक्त श्री गणेशाला नतमस्तक होऊन गणेश चतुर्थी साजरी करत आहेत. या जहाजावर कार्यरत असलेले व गणेशोत्सव सोहळ्याचे प्रमुख आयोजक दीपक नाईक यांनी जहाजावर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची सविस्तर माहिती दिली.
पी अँड ओ क्रूझेस ही इंग्लंडची कंपनी असून त्यांचे जहाज हे गणेशोत्सवाच्या काळात फ्रान्समध्ये समुद्रात असून या जहाजावर मराठी माणसे वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करत आहेत. जहाजावर चार हजार प्रवासी असून पंधराशे कर्मचारी आहेत. भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील हे कर्मचारी असून बरेचसे कर्मचारी हे विदेशी आहेत.
नोकरीनिमित्त तब्बल सहा सहा महिने या कर्मचाऱ्यांना जहाजावर व्यतीत करावे लागतात. सर्वधर्मीय सण या जहाजावर उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सवाला वेगळे महत्त्व आहे. येथील मराठी कर्मचारी गेली २५ वर्षे सातत्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. मराठी तरुणांनी गणेशोत्सव सणानिमित्त एकत्र येऊन उत्साह पूर्ण वातावरणात बोटीवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पहिल्या दिवशी गणपतीची विधीवत पूजा केल्यानंतर आरती गाताना सर्व पर्यटक, कर्मचारी व गणेश भक्त लीन होऊन गणेशाला नतमस्तक होतात. यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने कैलास पर्वताचा देखावा उभारला आहे.
गणेशोत्सव जहाजावर साजरा करण्यात येत असल्याने तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते. या उत्सवा दरम्यान जमा झालेल्या वर्गणीतून किंवा गोळा झालेली देणगीची रक्कम ही मदत म्हणून भारतातील अनाथालय व वृद्धाश्रमला देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षी भारतात परतल्यानंतर या सर्व रकमेचा विनियोग समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी करणार असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

चौकट
सर्वधर्मीयांचा सहभाग
या जहाजावरील गणेशोत्सवात केवळ मराठी बांधवच नव्हे तर जहाजावरील सर्वधर्मीय श्रद्धेने सहभागी होतात. परदेशी पर्यटक तर टाळ मृदुंग ढोलकी या वाद्यांवर तल्लीन होऊन जातात. आरतीची सांगता झाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’ हा गजर जल्लोषी आवाजात सर्वजण गातात. भारतातील सांस्कृतिक परंपरा व गणेशोत्सवातील धार्मिक विधी परदेशी पर्यटकांना विशेष भावत असल्याचे त्यांनी सांगितले. गणपतीला खास उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखविण्यात येतात. कंपनीच्या वतीने गणेशोत्सवाचे पहिले पाच दिवस सर्वांना शाकाहारी प्रसाद देण्यात येतो. विसर्जनाच्या दिवशी सर्वांना गोड पदार्थाचे जेवण दिले जाते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गणेश मूर्तीचे मोठ्या टब मध्ये विधिवत विसर्जन करण्यात येते.

चौकट
दिवसातून दोनवेळा आरती
जहाजावरील गणपतीची दिवसातून दोन वेळा आरती करण्यात येते. दुपारी साडेबारा वाजता व रात्री साडेअकरा वाजता आरती होते. सर्वजण आपापल्या कामाच्या वेळा सांभाळून गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा करतात. रात्री कामे आटोपल्यानंतर सर्वजण एकत्र मिळून गणपतीची आरती करतात. यावेळी विदेशी पर्यटक व कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com