
swt318.jpg
N89232
तेजस बांदिवडेकर
swt319.jpg
89233
श्यामल धुरी
नेमळे पंचक्रोशी शिक्षण
संस्थेचे पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत शिक्षक दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी माहिती दिली. माजी अध्यक्ष (कै.) श्रीपाद गोविंद तथा तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार येथील हणमंत कृष्णाजी देसाई उर्फ अप्पा देसाई यांना जाहीर झाला आहे.
सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयातून ते टेलिफोन ऑपरेटर या पदावरून निवृत्त झाले आहेत. ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. या संघटनेमार्फत त्यांनी सामाजिक कार्यातून जनजागृतीसह वैद्यकीय शिबिरे, रक्तदान, समाजातील वंचित घटकांना पारंपरिक आहारभेट आदी उपक्रम हाती घेतले आहेत.
नेमळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक (कै.) ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ नलिनी पेंढारकर यांनी प्रस्थापित केलेला उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक शाळा वजराट क्र. १ (ता. वेंगुर्ले) येथील उपशिक्षक तेजस बांदिवडेकर यांना, (कै.) शिवरामभाऊ जाधव यांच्या पत्नी (कै.) प्रमिला जाधव यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सरस्वती विद्यालय, कालेली (ता. कणकवली) येथील शिक्षिका श्यामल धुरी यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक व समाजभूषण कार्यकर्त्यांचा गौरव सोहळा लवकरच होणार आहे.