मनसेवर परिणाम होणार नाही
‘नेत्याच्या भाजप प्रवेशामुळे
मनसेवर परिणाम नाही’
रत्नागिरी ः मनसेतून बडतर्फ केलेल्या काही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी सांगितला. जाधव म्हणाले, जिल्ह्यातील ९५ टक्क्यांहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. यापुढील काळात मनसे रत्नागिरी जिल्ह्यात कात टाकून नव्या जोमाने उभारी घेईल. महाराष्ट्र सैनिक आपल्या निष्ठा व कर्तृत्वातून पक्षप्रेम सिद्ध करतील. या वेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर विश्वास व्यक्त केला.
स्वामी समर्थांवर
कुडलीत देखावा
गुहागर ः गुहागर तालुक्यातील कुडली (मोडा) येथील सुरेश डोर्लेकर व चंद्रकांत डोर्लेकर यांनी गणेशोत्सवामध्ये स्वामींचा दर्शन देखावा केला आहे. त्यांनी या ठिकाणी अक्कलकोट स्वामी समर्थांची संपूर्ण माहिती दाखवली आहे. येथील स्वामींचे भक्त या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेताना स्वामींचे दर्शन घ्यायला गर्दी करत आहेत. त्यांचा प्रकट काळ १८५६ ते १८७८ या काळात होता. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नृसिंहभान असून, श्रीशैल्यजवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. हे सर्व त्यांनी देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आरपीआय (आठवले)ची
दापोलीत शनिवारी सभा
दापोली ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची दापोली तालुक्याची जाहीर सभा शनिवारी (ता. ६) सकाळी ११.३० वाजता दापोली तालुक्यातील भाटकर हॉस्पिटलच्या पुढे हॉटेल अभिषेक येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके, नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, दापोली तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस दिनेश रूके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रेश्मा नेवरेकर, उपाध्यक्ष रेश्मा जाधव, सरचिटणीस दीक्षा रूके, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र जाधव, सरचिटणीस अंकित कदम आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा ३ ऑक्टोबर रोजी क्रांती भूमी महाड येथे वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जाण्यासाठी महिला- पुरुष कार्यकर्त्यांचे, सभासदांचे आणि गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.