निरवडे-मनिष फार्मजवळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

निरवडे-मनिष फार्मजवळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

Published on

निरवडे-मनिष फार्मजवळ
रस्त्यावर खड्डेच खड्डे
निरवडे : येथील मनीष फॉर्मजवळील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाढवळ्या या खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत आहेत, तर रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात येऊनही संबंधित विभागाने दखल घेतलेली नाही. या मार्गावर राजकीय तसेच शासकीय अधिकाऱ्यांची ये-जा असूनदेखील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात रस्त्यावरील हे खड्डे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असून, लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
--------------
गायकवाड यांनी घेतली
पालकमंत्री राणेंची भेट
कणकवलीः अन्न व प्रशासन विभाग सिंधुदुर्ग चे नूतन सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली यावेळी श्री गायकवाड यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजासंदर्भात चर्चा केली यावेळी पालकमंत्री राणी यांनी त्यांचे स्वागत केले.
------------
दिवा एक्सप्रेसला
अखेर ‘पेण’मध्ये थांबा
सिंधुदुर्गनगरीः रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यास मान्यता दिली आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाला. २०१६ पर्यंत एक्सप्रेसला पेण थांबा होता. मात्र, नंतर तो थांबा काढण्यात आल्यानंतर प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पेण तालुका हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा केंद्रबिंदू असून येथून मुंबई व कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या थांब्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. पेण तालुक्यातील हजारो प्रवाशांना दिवा, पनवेल किंवा रोहा येथे जावे लागत होते. आता थांबा मिळाल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असून प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
-----------------
खर्डेकर महाविद्यालयात
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
वेंगुर्लेः येथील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्राचार्य प्रा. डी. जे. शितोळे, संस्थेचे प्रतिनिधी सुरेश चव्हाण, क्रीडा संचालक प्रा. जय. नाईक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी पदकप्राप्त खेळाडूंचेही गौरव करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com