2.36 कोटीचे विदेशी गोवा बनावटीचे मद्य जप्त
rat३p२४.jpg -
२५N८९२९८
राजापूर ः राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर पन्हळेतर्फे सौंदळ येथे जप्त केलेला दारूसाठा अन् ताब्यात घेतलेले संशयित.
पन्हळेतर्फे सौंदळत दोन कोटींचे मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ; कंटेनर जप्त, चालकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने तालुक्यातील पन्हळेतर्फे सौंदळ येथे कारवाई करत गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि दहाचाकी कंटेनर असा २ कोटी ३६ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात तालुक्यातल्या बार चालक-मालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर झालेल्या या कारवाईमुळे अवैधरीत्या गोवा बनावटीच्या दारूसाठ्याची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबईच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार तालुक्याच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर पन्हळेतर्फे सौंदळ येथे १ सप्टेंबर रोजी पाळत ठेवली होती. संशयास्पद वाटणारा दहाचाकी कंटेनर अडवला. त्याची तपासणी केली असता त्यात १८६६ बॉक्स गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. त्याची किंमत २ कोटी ११ लाख ७२ हजार २८० रुपये आहे. या संपूर्ण दारूसाठ्यासह ट्रक असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कंटेनर चालक आसिफ आस मोहम्मद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपअधीक्षक रवींद्र उगले तसेच निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. आर. गायकवाड हे करत असून, फिर्यादी जवान अमोल चौगुले आहेत. या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, जवान चंदन पंडित, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरीचे निरीक्षक अमित पडळकर, जवान नीलेश तुपे, जवान मलिक धोत्रे यांनी भाग घेतला.
----
चौकट
महसूल बुडवणारी टोळी
या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता असून, महाराष्ट्र शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवणाऱ्या या टोळीचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणात आणखीही काही मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.