आपत्कालात आधी मदत करा, मग व्हिडिओ काढा
rat४p५.jpg-
P२५N८९३८६
रत्नागिरी ः तालुक्यातील मावळंगे येथील अजय पारकर यांनी साकारलेला कशेळी येथील देवघळी परिसराचा देखावा.
----
‘प्रेक्षक नव्हे तर विघ्नहर्ता बना’
अजय पारकरांचा देखावा; श्रीगणेशाच्या माध्यमातून सामाजिक संदेश
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ ः एखाद्या दुर्घटनेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची प्रत्येकालाच घाई असते. या गडबडीत अनेकवेळा दुर्घटनेतील बाधिताला मदत करण्याचे राहून जाते. हाच धागा पकडून मावळंगे (ता. रत्नागिरी) येथील अजय पारकर यांनी श्रीगणेशाच्या माध्यमातून अपघात किंवा दुर्घटना झाल्यास आधी मदत करण्याला प्राधान्य द्या, मोबाईलवर प्रसंग चित्रित करत बसू नका, आपत्तीग्रस्तांचे विघ्नहर्ता बना, असा संदेश दिला आहे.
कोकणातील पर्यटनस्थळांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध होऊ घातलेल्या देवघळी बीच अर्थात कशेळी पॉइंटीचा देखावा साकारात मावळंगे (ता. रत्नागिरी) येथील अजय पारकर यांनी साकारला आहे. ते स्वतः मूर्तिकार आहेत. दरवर्षी विविध सामाजिक व पौराणिक देखावे सादर करतात. यंदा त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच देवघळी बीच अर्थात कशेळी पॉईंटचा देखाव तयार केला आहे. त्यांनी केलेली सजावट पाहण्यासाठी अनेक गणेशभक्त येत असतात. विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या देखाव्यांना परीक्षकांकडून उत्तम दाद मिळते. सुरुवातीपासूनच त्यांना असे देखावे तयार करण्याची आवड आहे. त्यांनी यंदा आगळावेगळा देखावा साकार केला आहे. कोकणात फिरायला आलेला एक तरुण कशेळी पॉईंटवरून खाली पडतो. तेथील इतर पर्यटक त्याला मदत करण्याऐवजी त्याचे फोटो व व्हिडिओ काढत बसतात तेव्हा आपला विघ्नहर्ता तिथे प्रकट होतो आणि त्याचे प्राण वाचवतो तसेच सर्वांना मार्गदर्शन करतो. एखादा अपघात झाल्यावर त्याची मदत करा. तो प्रसंग मोबाइलमध्ये चित्रित करत बसू नका. संबंधिताला वाचवून त्याचा विघ्नहर्ता बना, असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला असल्याचे पारकर यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.