जामगेत गणेशोत्सवात जाखडीचा डंका

जामगेत गणेशोत्सवात जाखडीचा डंका

Published on

- rat४p३.jpg-
२५N८९३८४
खेड ः येथील माजी मंत्री रामदास कदम यांच्या जामगे येथील निवासस्थानी जाखडी नृत्य सादर करताना ग्रामीण भागातील मंडळ.
---
जामगेतील गणेशोत्सवात जाखडीचा डंका
शेकडो कलाकारांची हजेरी ; ३५ वर्षे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : कोकणातील पारंपरिक लोककला म्हणून जाखडी नृत्याकडे पाहिले जाते. या कलेला शासनस्तरावर फारसे प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे ही कला जपणाऱ्या कलाकारांना बळ देण्यासाठी गेली ३५ वर्षे जामगे येथे शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गणेशोत्सवात जाखडी नृत्य सादरीकरणाचा उपक्रम सुरू केला. ती परंपरा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुढे चालवली आहे.
कोकणातील गणेशोत्सवात विविध परंपरा जपल्या जातात. घरोघरी जाऊन आरत्यांचा आनंद घेणे, भजने, जाखडीचे कार्यक्रम गावोगावी होत आहेत. या लोककला फक्त त्या त्या गावांची ओळख बनलेल्या आहेत. त्यांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रयत्न सुरू आहेत. हाच धागा लक्षात घेऊन माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवात जाखडी नृत्याचे कार्यक्रम सादर केले जातात. पंचक्रोशीतील जाखडी मंडळं जामगे येथे सादरीकरणासाठी दरवर्षी तिथे येतात आणि आपली कला सादर करतात. कदम कुटुंबीयांतर्फे त्यांना यथोशयोक्ती मदतही केली जाते. यंदाही हा उपक्रम सुरू आहे.
गेले पाच दिवस हजारो कलाकारांनी जाखडी, भजन, दशावतार, शक्तीतुरा, शाहीर अशा विविध कलाप्रकारांतून आपली कला सादर केली आहे. कलाकारांना प्रोत्साहन म्हणून ढोलकी, झांज, पेटी यांसारखी वाद्ये तसेच रोख मानधन देण्याची परंपरा गेली तीन दशके अविरत सुरू आहे. या निमित्ताने जामगे येथे माजी मंत्री रामदास कदम यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र येत असते. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.
----
कोट
माझ्या वडिलांनी आमदारकीच्या पहिल्या कार्यकाळात आमच्या घरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्या परंपरेतून दरवर्षी चारशे ते साडेचारशे मंडळं आमच्या गणरायासमोर कला सादर करतात. कोकणातील जाखडी, भजन, दशावतार या कलांना प्रोत्साहन देणं, हाच आमचा उद्देश आहे.

- योगेश कदम, गृहराज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com