साखरपा-गव्यांकडून भातशेतीचे नुकसान

साखरपा-गव्यांकडून भातशेतीचे नुकसान

Published on

-rat४p२५.jpg-
P२५N८९४६०
साखरपा : गव्यांनी नुकसान केलेली शेती.
----
गव्यांकडून भातशेतीचे नुकसान
देवळे, चाफवलीत धुमाकूळ ; भातपेरणीवेळीही फटका
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ४ : नजीकच्या देवळे आणि चाफवली गावात गव्यांकडून तयार होत आलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या काही ठिकाणी भातशेती आता तयार होण्यास प्रारंभ झाला आहे. भातरोपांना धान्याच्या लोंबी धरण्यास प्रारंभ झाला आहे. त्या वेळीच देवळे आणि चाफवली गावात गव्यांनी शेतात घुसून शेतीचे मोठे नुकसान केले आहे. देवळे गावात दिलीप शिर्के यांच्या शेतात तसेच चाफवली येथे विठ्ठल चाळके यांच्या शेतात हा प्रकार घडला आहे. दोन गावात भातपेरणीनंतरही असाच प्रकार घडला होता. त्या वेळी गव्यांनी रुजून आलेली भातरोपे खाऊन आणि तुडवून टाकल्यामुळे आधीच नुकसान झाले होते. त्यातून उरलेल्या शेतीला लोंबी येण्यास सुरुवात होत असताना पुन्हा गव्यांनी नासधूस केली. त्यामुळे शेतातून काय उत्पन्न मिळणार, असा प्रश्न दोन्ही गावातील शेतकऱ्‍यांना पडला आहे. वनविभागाने तत्काळ नुकसानीची दखल घ्यावी, अशी मागणी शिर्के आणि चाळके यांनी केली आहे तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि परिसरातील गव्यांचा पुरता बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com