-पुस्तकातला इतिहास विद्यार्थ्यांमध्ये रूजवणारा शिक्षक
शिक्षक दिन विशेष--लोगो
-rat४p२४.jpg-
२५N८९४५९
साखरपा : उपक्रमशील शिक्षक सतीश वाकसे, दुसऱ्या छायाचित्रात पावनखिंड पुस्तकाची माहिती विद्यार्थ्यांना देताना सतीश वाकसे.
----
पुस्तकातला इतिहास विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारा शिक्षक
सतीश वाकसे ; प्रात्यक्षिकातून शिक्षण, पाठ्यपुस्तकापलीकडे जाण्याचा ध्यास
अमित पंडित : सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ४ : शिक्षक ही केवळ नोकरी नाही तर तो एक पेशा आहे, यात केवळ विषय शिकवणे अपेक्षित नाही तर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विषय रूजवणे अपेक्षित आहे आणि याच मानसिकतेतून काम करणारे शिक्षक म्हणजे सतीश वाकसे.
देवधामापूर सप्रेवाडी (ता. संगमेश्वर) शाळेत सेवा करणारे वाकसे हे तालुक्यात इतिहासप्रेमी म्हणून ओळखले जातात. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार गावाचे. २००१ ला सेवा सुरू केली तेव्हा त्यांची दुसरी शाळा बांबरवाडी. ही शाळा पन्हाळगडाचा जोडगड अशी ओळख असलेल्या पावनगडाच्या पायथ्याशी असलेली ही शाळा. शाळेत इतिहास शिकवताना त्यातील ठिकाणे प्रत्यक्ष कशी दिसतात हे विद्यार्थ्यांना जाऊन दाखवली पाहिजेत. त्यातूनच मग गडभेट हा उपक्रम सूचला. सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन दरवर्षी एका किल्ल्याला भेट देण्याचा उपक्रम सुरू झाला. यात शिवा काशीद समाधीस्थळ, गोपाळतीर्थ बागेतील विरांच्या समाधी, आपटी गावातील सरदार यशवंतराव थोरात यांची समाधी, पुनाळ गावातील ज्योत्याजी केसरकर समाधी अशी स्थळे त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवली.
कालांतराने २०१७ ला वाकसे यांची बदली संगमेश्वर तालुक्यात झाली आणि त्यांचे उपक्रम इथेही सुरू राहिले. ऐतिहासिक नाणी, शस्त्रे यांचे प्रदर्शन हा त्यांचा आणखी एक उपक्रम. राज्याभिषेकाप्रसंगी महाराजांनी टाकसाळीत तयार केलेली ही नाणी. त्यांच्याबरोबर निजामकालीन नाणी, मौर्यकालीन नाणी यांचीही प्रदर्शने त्यांनी भरवली. वेगवेगळ्या तलवारी, पट्टे, वाघनखे, कट्यारी, खंजीर अशी शत्रेही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेत आणून दाखवली आहेत. वाकसे यांनी विविध किल्ल्यांवरील मातीचा संग्रह केला आहे. ही माती पवित्र आहे, या भावनेतून त्यांनी हा संग्रह केला आहे. पानिपत आणि पावनखिंडीतील मातीही त्यांच्या संग्रहात आहे.
चौकट
ऐतिहासिक कादंबऱ्यांचे शाळेत वाचन
वाकसे हे स्वत: चोखंदळ वाचक आहेत. ही कला विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. एक कादंबरी घेऊन दरवर्षी तिचे वाचन क्रमश: पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले आहे. ऐतिहासिक कादंबर्यांमधील वीररस विद्यार्थ्यांना समजावा हा यामागचा हेतू असल्याचे ते सांगतात.
कोट
शिवकालीन इतिहास हा आपला समृद्ध वारसा आहे. तो केवळ पाठ्यपुस्तकात शिकवून समजत नाही त्यासाठी तो अनुभवावा लागतो आणि त्यासाठी हे विविध उपक्रम आयोजित केले. पुस्तकातला इतिहास जगण्यात आला पाहिजे. विद्यार्थी त्यात रमतात, त्यांना त्याची गोडी लागते, अभ्यासापलीकडे जाऊन ते इतिहास शिकतात.
- सतीश वाकसे, शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.