डेंगीसह साथरोगाने सिंधुदुर्ग हैराण
डेंगीसह साथरोगाने सिंधुदुर्ग हैराण
आरोग्य यंत्रणा अलर्ट; आठ महिन्यांत मलेरिया चिकुनगुनियाचेही रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः जिल्ह्यात साथीचे आजार वाढत असून, जिल्हा हिवताप विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे तब्बल १०५, मलेरियाचे ८५, तर चिकुनगुनियाचे ४४ रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डबक्यांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया अशा कीटकजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. घरासमोर पाणी साचू देऊ नये, खिडक्यांना जाळी लावावी, मच्छरदाणीचा वापर करावा, बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. अंगात कणकण, ताप जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर होऊ शकतो, असा इशाराही आरोग्य विभागाने दिला आहे.
चौकट
जिल्हाबाहेरील रुग्णांचे प्रमाण जास्त
जिल्ह्यात नोंदवले गेलेले डेंग्यूचे बहुतेक रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील असून, कामानिमित्त सिंधुदुर्गात आलेले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अगदी मोजकी असल्याचे हिवताप विभागाने स्पष्ट केले आहे.
चौकट
आजारांची लक्षणे
डेंग्यू : दोन ते सात दिवस तीव्र ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या
मलेरिया : डोकेदुखी, थकवा, तीव्र ताप, अस्वस्थता
चौकट
तपासणी अहवाल (जानेवारी ते ऑगस्ट)
तापाचा प्रकार*तपासलेले नमुने*बाधित
हिवताप*१,२२,२६२*८५
डेंग्यू*३,०७९*१०५
चिकुनगुनिया *१,३९७*४४
कोट
पावसाळ्यात कीटकजन्य तसेच साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
– डॉ. रमेश कर्सस्कर, जिल्हा हिवताप अधिकारी, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.