संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

rat५p२१.jpg-
२५N८९६७३
पावस - तालुक्यातील गावडे आंबेरे येथील विश्वेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरदचंद्र लेले यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
मुख्याध्यापक शरदचंद्र लेले सेवानिवृत्त
पावस ः गावडे आंबेरे येथील विश्वेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरदचंद्र लेले ३१ ऑगस्ट २०२५ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने प्रशालेच्या सर्व (१९९४ पासून ते २०२५) माजी विद्यार्थ्यांकडून सरांचा भव्य गौरव सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी शाळेच्या व लेले यांच्या ३४ वर्षाच्या वाटचालीवर भाष्य करणाऱ्‍या ‘किमयागार’ या गौरव विशेषांकाचे प्रकाशन माजी आमदार बाळासाहेब माने, माजी शिक्षण सभापती उदय बने, शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी प्रकाश बिर्जे, यशवंत डोर्लेकर, रवींद्र बिर्जे, वसंत नाटेकर तसेच सुभाष पोतकर, हर्चे प्रशालेचे अध्यक्ष भाई मयेकर, माजी मुख्याध्यापक आनंदकुमार जाधव, सरपंच लक्ष्मण सारंग व परिसरातील सरपंच व पोलिसपाटील यांच्या हस्ते झाले.
---
राजापुरात शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
राजापूर ः राजापूर नगर वाचनालयाच्यावतीने ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी (ता. ९) सायंकाळी ५.३० वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये हे व्याख्यान होणार असून या वेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजापूर वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
--
ratchl५१.jpg ः
२५N८९७११
चिपळूण ः डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना शिक्षक.
---
सती प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन
चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सती चिंचघरी येथील प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी शिक्षकांची भूमिका आणि त्यांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात सकपाळ यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. या वेळी सकपाळ यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व शिक्षकाची भूमिका या विषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कांबळी यांनी केले होते. कार्यक्रमासाठी शिक्षिका रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे आदींनी विशेष मेहनत घेतली.
--
ratchl५२.jpg
२५N८९७१२
-योगेश खांडेकर

उमरोली तंटामुक्ती अध्यक्षपदी खांडेकर
चिपळूण ः तालुक्यातील उमरोली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी योगेश खांडेकर यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या युवा कार्यकर्त्याची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. पाखर झेप युवा संघटनेच्या माध्यमातून क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक इत्यादी क्षेत्रात आपली चमकदार कामगिरी करत तरुणांना प्रेरणा देणारे असे योगेश खांडेकर यांचे नेतृत्व आहे. शेतकरी-कष्टकरी लाकूड व्यापारी संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने त्यांनी रामपूर विभागातील सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडवून आणले आहे. उमरोली गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी खांडेकर यांची निवड होताच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com