दापोली - परतीच्या प्रवासासाठी तब्बल १९९ बसेस
परतीच्या प्रवासासाठी १९९ एसटी बस
दापोली आगारप्रमुख उबाळे ः चाकरमान्यांकडून समाधान
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ : दापोली आगाराच्या सुयोग्य नियोजनामुळे कोकणवासियांचा प्रवास सुखकर झाला. परतीच्या प्रवासासाठी गेल्या तीन दिवसांत तब्बल १९९ बसेस सुटल्या, अशी माहिती आगारप्रमुख राजेंद्र उबाळे यांनी दिली.
गौरी-गणपती सण हा कोकणातील चाकरमान्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा सण मानला जातो. दरवर्षी लाखो कोकणवासीय मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणांहून आपल्या गावी पोहोचण्यासाठी उत्सुक असतात. अशा वेळी दापोली आगाराने यंदाही प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी केलेल्या सुयोग्य नियोजनाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
गौरी-गणपती २०२५ निमित्त मुंबईहून गावी जाणाऱ्या आणि नंतर परतीच्या प्रवासासाठी होणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करून दापोली आगाराने २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत स्वतंत्र नियोजन आखले होते. या अंतर्गत परतीच्या प्रवासासाठी २ सप्टेंबर ६१ बसेस, ३ सप्टेंबर तब्बल १०५ बसेस तर ४ सप्टेंबर ३३ बसेस सोडण्यात आल्या. केवळ तीन दिवसांत एकूण १९९ बसेस मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण विठ्ठलवाडी, नालासोपारा आदी ठिकाणी वेळेवर पोहोचल्या.
या संपूर्ण नियोजनामुळे हजारो प्रवासी विनातक्रार, सुखरूप आणि आपल्या इच्छितस्थळी वेळेत पोहोचले. प्रवासीवर्गाने या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत दापोली आगार प्रशासनाचे विशेष कौतुक केले आहे. आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे, स्थानकप्रमुख प्रभुणे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाफडे तसेच संपूर्ण कर्मचारीवृंद यांनी अत्यंत जबाबदारीने आणि सूक्ष्म नियोजन करून सेवा पुरवल्याचे प्रवाशांनी सांगितले. कोकणातील सणावारी गर्दीच्या पार्श्वभूमीवर दापोली आगाराने दाखवलेले हे नियोजन इतर आगारांसाठी आदर्शवत ठरावे, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासामुळे गौरी-गणपती सणाची गोडी आणि उत्साह अधिकच वृद्धिंगत झाला आहे.
एसटीप्रेमी संघटनांचे सहकार्य
विशेषतः कोकण एसटीप्रेमी संघटना दापोली यांच्याही सहकार्याचा उल्लेख आगारप्रमुखांनी केला. प्रवाशांना सुखरूप आणि समाधानकारक सेवा देणे, हे आमचे कर्तव्य आहे. या नियोजनात प्रवाशांनी दाखवलेले सहकार्य आणि स्थानिक संघटनांचे पाठबळ आम्हाला अधिक उत्तम सेवा देण्यासाठी प्रेरणा देते, असे आगारप्रमुख राजेंद्र उबाळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.