''त्या'' नगरसेवकांबाबत राणेंचा निर्णय मान्य
swt520.jpg
89789
निलेश राणे
''त्या'' नगरसेवकांबाबत राणेंचा निर्णय मान्य
निलेश राणेः सावंत यांच्या म्हणण्याला किंमत देत नाही
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः येथील नगरपंचायतील सहा नगरसेवकांच्या भाजपमधून निलंबनबाबत मी सामोरा जायला समर्थ आहे. येत्या दोन दिवसांत यावर मी बोलेन. याबाबत भाजपचे प्रभाकर सावंत काय म्हणतात याला मी किंमत देत नाही. आमचे मार्गदर्शक माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे जो निर्णय देतील तो मान्य असेल, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
येथील नगरपंचायतीच्या सहा नगरसेवक निलंबनाबाबत सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी त्या सहा नगरसेवकांच्या निलंबनाबाबत कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, ‘‘मी तुम्हाला उदाहरण देत आहे की, राजकारण हेतू कोणाचा आहे? नेमकं काय चालले आहे? याबाबत सिंधुदुर्गातील हुशार जनतेला निश्चितच माहिती आहे. मी सुद्धा भाजपमध्ये होतो. तिथून शिंदे शिवसेनेमध्ये गेलो. शिवसेनेचा आमदार होऊन आता जवळपास एक वर्ष होत आले. भाजपची जशी प्रक्रिया जिल्हा पातळीवर चालते तशीच प्रक्रिया प्रदेशवरही चालते. मी प्रदेशवर असताना मला कधी निलंबनाचे पत्र आले नाही. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय हे चुकीचे आहे. याच्यावरून सर्व लक्षात येत आहे. नगरपंचायतीची ज्यावेळी निवडणूक झाली, त्यावेळी जे सहा नगरसेवक निवडून आले त्यावेळी राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे त्यावेळी स्वाभिमानी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे खासदार नारायण राणे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये गेले होते. यामध्ये सहा नगरसेवक सुद्धा होते. खासदार नारायण राणें यांच्या मेहनतीने आणि सहा नगरसेवक हे आपल्या कर्तृत्वावर निवडून आले होते. त्यावेळी भाजपच्या तिघांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे कोण काय करते? कशासाठी करते? आपल्या या कृतीमुळे विरोधकांचा कसा फायदा होईल हे एकंदर यावरून दिसून येत आहे. मी या सर्व गोष्टीला सामोरा जायला तयार आहे. सध्या मी मुंबईला असल्यामुळे दोन दिवसानंतर यावर बोलेन. सावंत काय बोलतात याला मी किंमत देत नाही. आमचे मार्गदर्शक खासदार राणे आहेत. ते जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल."
----------------
swt521.jpg
89790
अभिषेक गावडे
‘त्या’ नऊ नगरसेवकांपैकी
एकाने तरी पुन्हा लढून दाखवावे
अभिषेक गावडे ः निलंबनाच्या कारवाईवर प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु, आपण देखील ठाकरे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले सात नगरसेवक किंवा भाजपचे २ निष्ठावंत नगरसेवक अशा नऊ जणांपैकी केवळ एकाने राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. जनता कोणाच्या बाजूने आहे हे कळेल, असे प्रत्युत्तर कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला दिले आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या ६ नगरसेवकांच्या निलंबनानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. श्री. सावंत यांनी काल (ता.४) याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपण केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर ठाम असल्याचे म्हटले. याला प्रत्युत्तर देताना नगरसेवक गावडे यांनी म्हटले की, ‘आम्हाला जेव्हा तिकीट दिले गेले तेव्हा आपल्याच पक्षाच्या निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी गद्दारी करून आमच्या विरोधात काम केले. खर तर निवडणूक कमळ चिन्हावर लढलो असलो तरी राणे समर्थक विरुद्ध भाजप व सगळे अशीच लढत माझ्या वार्डमध्ये झाली. तरी नगरपंचायतीमध्ये आपल्या पक्षात सर्वात जास्त मताधिक्क्याने मी विजयी झालो. सावंत यांनी माझे पक्षातून निलंबन केले. मी नगरसेवक पदाचा देखील राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु, सावंत यांनी ठाकरे शिवसेनेकडून घेतलेले सात नगरसेवक किंवा आपल्याकडे राहिलेले दोन निष्ठावंत नगरसेवक अशा नऊ जणांपैकी एकाने राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जावे. मग जनता कोणाच्या बाजूने आहे हे लवकरच समजेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.