संजय गांधी, श्रावणबाळचे अनुदान २५०० रूपये
‘संजय गांधी, श्रवणबाळ’ लाभार्थ्यांना दिलासा
अनुदानात एक हजार रुपयांची वाढ ; जिल्ह्यातील संख्या ३९ हजार ३९०
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : संजय गांधी निराधार योजनेसह आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा मोठा आधार जिल्ह्यातील निराधार, अपंग, विधवा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळत आहे. शासनाच्या कॅबिनेच्या बैठकीत या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये हजार रुपयांची वाढ केली आहे. १५०० रुपयाऐवजी आता २५०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यातील २३ हजार ५० संजय गांधी निराधार योजनेतील आणि १६ हजार ३४० श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तेवढाच आर्थिक भार मात्र शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचा एकूण २३ हजार ५० नागरिकांना लाभ मिळत आहे. यामध्ये अनुसूचित जातीमधील १,८६६ आणि अनुसूचित जमातीमधील ५४ लाभार्थी आहेत याशिवाय, इतर योजनांचे लाभार्थी आहेत. यापूर्वी त्यांना दरमहा १५०० रुपये अनुदान मिळत होते. शासनाने त्यामध्ये वाढ करून आता २ हजार ५०० रुपये केले आहे तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे ६,७६९ लाभार्थी आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेचे १,३७६ लाभार्थी आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या २२८ आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून एकूण ५२ लाभार्थींना मदत मिळाली आहे. संजय गांधी निराधार योजनेत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ३,७१४ लाभार्थी आहेत तर त्या पाठोपाठ चिपळूण ३१७३, खेडमध्ये ३१७०, संगमेश्वरमध्ये ३१५६, दापोलीत २८५८, गुहागरमध्ये २४९४, राजापूर २२२५ आणि लांजा तालुक्यात १५४८ व मंडणगड तालुक्यात ७०७ लाभार्थी आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना खेडमध्ये सर्वाधिक २०५७ त्यानंतर चिपळूण २०५६, संगमेश्वर २५५५, दापोली २०२९, राजापूर १९३९, रत्नागिरी १७९१, लांजा १५६४, गुहागर १६५२, मंडणगड ६९७ असे एकूण १६ हजार ३४० लाभार्थ्यांना वाढीव निधीचा लाभ मिळणार आहे. या सरकारी योजनांचा फायदा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहे आणि गरजू लोकांना आर्थिक आधार मिळत आहे.
---
चौकट...
‘इंदिरा गांधी वृद्धापकाळ’चे ६७६९ लाभार्थी
इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेत संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यांची संख्या अनुक्रमे १५५७ आणि ९४१ इतकी आहे तर त्या खालोखाल दापोलीत ८१७, गुहागर ७३५, लांजा ७३४, राजापूर ७०५, खेड ५७०, रत्नागिरी ४८८ मंडणगड २२२ इतकी लाभार्थी संख्या आहे. एकूण ६७६९ लाभार्थी जिल्ह्यात आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.