कुडाळातील शिबिरात ३९ जणांचे रक्तदान

कुडाळातील शिबिरात ३९ जणांचे रक्तदान

Published on

फोटो आलेला नाही
swt711.jpg मध्ये फोटो आहे.

कुडाळ ः फ्रेण्ड्स ग्रुपच्या वतीने नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते एजाज नाईक यांचा सत्कार करताना समद मुजावर, रुफा नाईक आदी.

कुडाळातील शिबिरात ३९ जणांचे रक्तदान
‘मिल्लत’, फ्रेण्डस ग्रुपचे आयोजन ः गणेशोत्सव, ‘ईद ए मिलाद’निमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत फ्रेण्ड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये तीन महिला रक्तदात्यांसह एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान करत गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण खऱ्या अर्थाने पवित्र सामाजिक सत्कार्य करत साजरा केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. याच काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवाशांची संख्याही वाढल्याने रक्ताची मागणी प्रचंड वाढलेली असते. सध्या जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल ५० रक्तदात्यांनी बहुमोल रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे आयोजित रक्तदान शिबिरात नेरुर, सरंबळ, सोनवडे, दुर्गवाड आणि पंचक्रोशीतील तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. या सर्वांचा फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाडतर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. शिबिराच्या आयोजनासाठी फ्रेंड्स ग्रुप आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य मस्जिद, मदरसा कमिटींना मार्गदर्शन करत प्रोत्साहित केल्याबद्दल ग्रुपच्या वतीने माजी सरपंच समद मुजावर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे एजाज नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
एजाज नाईक यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद केले. दर्गाह, मशीद, मदरसा या ठिकाणी आयोजित होत असलेल्या रक्तदान शिबिरांद्वारे सामाजिक एकोपा जपत सर्वधर्मीय रक्तदाते एकत्र येतात, हे उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सायकॉलिजिस्ट रुफा नाईक यांनी शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. समाजाने रक्तदानासारखे चांगले उपक्रम राबवत आरोग्यदायी समाज व्यवस्था निवडावी, असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते रुपेश पावसकर, श्री. म्हाडदळकर, मॅक्सी पिंटो, ॲड. नाझनीन नाईक आदींनी रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या. शिबिराचे उद्‌घाटन रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत लंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेरुर माजी उपसरपंच समद मुजावर, माजी नगरसेवक एजाज नाईक, मुश्ताक नाईक, आजीम मुजावर, झाकिरा खान, बशीर मुजावर, जोहेल नाईक, अनिस शाह, शायर खान, निझाम खान, बदर मुजावर, मकबुल मुजावर, मनसुर ख्वाजा, महेक ख्वाजा, आसिफ खान, नईम शेख, अब्दुल शहा, रफिक मुजावर, इद्रूस मुजावर, अनफाल खान, तबरेज खान, दिनेश साळुंखे, सलमान मुजावर, फिरोज खतीब, समीर मुजावर, किशोर वरक, अक्षय वरक, अजय झोरे, बाबूराव वरक, नफीस शेख, उझेर मुजावर, रमीझ मुजावर, प्रकाश धुरी, दत्ताराम म्हाडदळकर, जोहेल नाईक, शादत नाईक, सदफ खान, फैझ मुजावर, इमरान मुजावर, मोहम्मद गोलंदाज, साजिद शहा, अब्दुल्ला मुजावर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी रक्तपेढीचे कर्मचारी साई सावंत (रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी), समाजसेवा अधीक्षक नितीन तूरनर, अधिपरिचारिका नीता आरोलकर, रक्तकेंद्र तंत्रज्ञ प्रांजली पावसकर, रक्तकेंद्र सहायक ऋतुजा हरमळकर, रक्तकेंद्र परिचर विजय निरुखेकर, गणपत गाडगे, नितीन गावकर, वाहनचालक यांचा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com