सरपंचांची ताकद विधायकदृष्ट्या वापरली तर सगळी बक्षिसं आपणाला
rat7p14.jpg-
25N90032
रत्नागिरी-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत अन्य मान्यवर.
---
गावचा सरपंच म्हणजे गावचा मुख्यमंत्री
पालकमंत्री उदय सामंत ः पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 7 : स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. ग्रामसभा या विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. गावचा सरपंच गावचा मुख्यमंत्री असतो. सरपंचाची ताकद त्यांनी विधायकदृष्ट्या जर वापरली अख्ख्या गावाला घेऊन जर काम केलं तर सगळीच्या सगळी बक्षिसं आपण मिळवू शकतो. आपल्या जिल्ह्याचा सर्वांकडून विकास झाला पाहिजे. आपल्या जिल्ह्याकडे आदर्श म्हणून महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे त्यासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवनमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, जर अजून काही गावे महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर आणायची असतील तर स्वच्छता असणं गरजेचं आहे. तिथे 50-50 घरांमध्ये न्याहरी निवास योजनेचे काम सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे. आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे. हे अभियान शंभर दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने राबवायचे असेल तर या सरपंचांबरोबर, ग्रामसेवकांबरोबर अधिकारीदेखील असणे गरजेचे आहे. आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी जर कंपनी येत असेल तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये जर कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडतं. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा रत्नागिरी आहे की, डीपीसीच्या फंडातून घनकचऱ्याच्या गाड्या दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये होणारा जो कचरा आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही जमा केला पाहिजे. त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. स्वच्छ, निर्मळ वातावरणामध्ये आपला गाव ठेवला पाहिजे.
आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाजाप्रति आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, या भावनेतून सरपंचांनी, ग्रामपंचायत सदस्यांनीदेखील या अभियानात काम करावे. संधी तुम्हाला चालून आली आहे. हे 100 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत.
---
चौकट...
शाळांच्या पटसंख्येबाबत आत्मचिंतन करा
सगळ्या परंपरा आणि संस्कार असणारा रत्नागिरी जिल्हा परीक्षेमध्ये पुढे असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेतला पट कमी का होतोय, हा देखील विचार शंभर दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी करायला हवा. दामले विद्यालय पहिलीमध्ये जर 160 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकते तर ग्रामीण भागातली शाळा 60 विद्यार्थ्यांना का देऊ शकत नाही, याचे आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये 99.99% शिक्षक चांगले असल्यामुळेच कोकण बोर्डामध्ये आपला एक नंबर येतो. त्याच्यामध्ये शिक्षकांना कुठेही कमी लेखण्याचं काम नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.