चिपळुणात वाहतूक कोंडी टाळण्यात यश

चिपळुणात वाहतूक कोंडी टाळण्यात यश

Published on

चिपळूणमध्ये वाहतूककोंडी टळली
नवीन पंप, पोलिसांचे नियोजन; भाविकांना सुरळीत प्रवास
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे दरवर्षी चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई–गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होत असते. मात्र यावर्षी पोलिस, एसटी आगार व पंपचालकांच्या सुयोग्य नियोजनामुळे ही कोंडी बऱ्याच प्रमाणात टळली.
सावर्डे व कामथे येथे सुरू झालेल्या दोन नवीन पंपांमुळे शहरातील पंपांवरील गर्दी विभागली गेली. महामार्गालगतच्या पंपांवर पार्किंगची सोय नसल्याने दरवर्षी वाहने रस्त्यावर उभी केली जात, त्यामुळे कोंडी होत असे. मात्र यावर्षी शिवाजीनगर पंपावर सीएनजी भरणाऱ्या वाहनांना थेट बसस्थानकात उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील कोंडी टळली.
पर्यायी मार्गांचा वापर, बाजारपेठेत वाहतुकीत बदल आणि मोठ्या संख्येने तैनात केलेला पोलिस फौजफाटा यामुळे भाविकांना सुरळीत प्रवासाचा अनुभव आला. दरवर्षी बसस्थानक परिसरात जाणवणारी कोंडी टाळण्यासाठी आगाऊ उपाययोजना करण्यात आल्या. शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या बसेस ठराविक अंतरावर थांबवण्यात आल्या. काही बसेस ग्रामीण भागात पाठवून तेथून प्रवासी उचलले गेले. त्यामुळे बस–खासगी वाहनांची गर्दी शिस्तबद्धरीत्या हाताळली गेली.

कोट
‘यावर्षी गणेशभक्तांना घेऊन ६०० बसगाड्या चिपळूणला दाखल झाल्या. चाकरमान्यांच्या परतीसाठी ३०० बस आरक्षित होत्या. प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी महामार्ग पोलिस, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण पोलिस, पंपचालक व चौपदरीकरणाची एजन्सी यांनी सहकार्य केले.’
– दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com