''फिजिओथेरपी'' कमी खर्चिक उपचार शैली

''फिजिओथेरपी'' कमी खर्चिक उपचार शैली

Published on

swt85.jpg
90153
अणावः येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमामध्ये वृद्धांसमवेत डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, ज्योतिरंजन पलटा सिंग, दीपाली वाळके व विद्यार्थी.

‘फिजिओथेरपी’ कमी खर्चिक उपचार शैली
डॉ. प्रत्युषरंजन बिस्वालः अणाव येथील वृद्धाश्रमात सेवा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ : फिजिओथेरपी ही कमी खर्चिक आणि वेदना दूर करणारी थेरपी आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल यांनी केले. जागतिक भौतिकोपचार (फिजिओथेरपी) दिनानिमित्त येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.
डॉ. बिस्वाल म्हणाले की, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था फिजिओथेरपीच्या माध्यमातून समाजाला विनामूल्य सेवा उपलब्ध करून देत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या निमित्ताने अणाव येथील आनंदाश्रय व माड्याचीवाडी येथील आजोळ वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांची आरोग्य तपासणी व उपचार सेवा देण्यात आली. या उपक्रमाचा ५७ वृद्धांनी लाभ घेतला.
या सेवेबद्दल वृद्धाश्रमातील रहिवासी व चालकांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले. शुक्रवारी (ता.५) महाविद्यालयांतर्गत फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग व पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर व प्रा. वैशाली ओटवणेकर उपस्थित होत्या.
६ व ७ ला कुडाळ परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी फिजिओथेरपी कॅम्प घेण्यात आला. यात शारीरिक समस्यांबाबत निदान, आरोग्य तपासणी व उपचार यांचा समावेश होता. आज सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभाने सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या सर्व उपक्रमांतून अनेक ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ घेतला. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य डॉ. बिस्वाल व सहकाऱ्यांनी ग्रामस्थांना उर्वरित सप्ताहातील विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com