सिंधुदुर्गात भाजपतर्फे सेवा पंधरावडा

सिंधुदुर्गात भाजपतर्फे सेवा पंधरावडा

Published on

swt83.jpg
N90151
सिंधुदुर्गनगरीः येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत. बाजूला (डावीकडून) अभियान संयोजक प्रसन्न देसाई, सह संयोजक प्राची इस्वलकर.

सिंधुदुर्गात भाजपतर्फे सेवा पंधरावडा
१७ पासून आयोजनः २ ऑक्टोबरपर्यत विविध सेवाभावी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस ता. ८ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरावड्याचे आयोजन केले आहे. याच अनुषंगाने भाजप सिंधुदुर्गकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरावड्याचे आयोजन केले असून, याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत अभियान संयोजक प्रसन्न देसाई, सह संयोजक प्राची इस्वलकर उपस्थित होते. श्री. सावंत यांनी ‘सेवा परमोधर्म’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन भाजप सिंधुदुर्ग विविध सेवाभावी उपक्रम हाती घेणार आहे. या सेवा पंधरावड्यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, दिव्यांगांचा सन्मान, ''विकसित भारत'' चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शनी, प्रबुद्ध संमेलन, २५ सप्टेंबर-दीनदयाळ उपाध्याय जयंती, २ ऑक्टोबर-महात्मा गांधी जयंती आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. हे सर्व कार्यक्रम केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होणार आहेत. तसेच भाजप किसान मोर्चाकडून ''एक पेड माँ के नाम'' हा विशेष उपक्रम राबविला जाणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
या निमित्ताने गुरुवारी (ता.११) सकाळी १०.३० वाजता जिल्हा कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व १४ मंडळांमध्ये सेवा पंधरावड्याचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमांचे जिल्हा संयोजक म्हणून प्रसन्न (बाळू) देसाई, सह संयोजक म्हणून विजय केनवडेकर व प्राची इस्वलकर, तर सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताची उभारणी होत असून, महात्मा गांधींच्या स्वदेशी मूल्यांवर आधारित भारत आज अमेरिकेलाही स्पर्धा देत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात सेवा पंधरावड्यातील उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

चौकट
प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या वाढदिनीही उपक्रम
सेवा पंधरावड्याच्या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा २० सप्टेंबरला येणारा वाढदिवसही विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com