पारंपरिक ''टोपली''ला दिली व्यावसायिक ओळख

पारंपरिक ''टोपली''ला दिली व्यावसायिक ओळख

Published on

मालिकेचे नाव ः बलशाली नारीशक्ती

swt88.jpg
90160
नांदोसः पूजा स्वयंसहाय्यता समुहाला उमेद अभियानाच्या वरिष्ठांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचे वस्तू भेट देऊन स्वागत करताना समुहातील महिला.
swt89.jpg व swt810.jpg
90161, N90159
नांदोसः नायलॉनपासून बनविलेल्या आकर्षक टोपल्या.


लीड
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब, गरजू, वंचित, घटस्फोटीत, विधवा अशा महिलांचे स्वयंसहायता समूह तयार करून त्या समुहांना दशसूत्रीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लावणे, अंतर्गत कर्ज वितरण करणे, उपजीविकेची माध्यमे उपलब्ध करून देणे व महिलांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावणे, महिलांना कुटुंबात आणि समाजात सन्मानाची वागणूक मिळून त्यांना स्वाभिमानी जीवन जगता यावे, या उद्देशाने उमेद अभियानात यंत्रणा परिश्रम घेते. त्याचबरोबर आरोग्य, स्वच्छता, शिक्षण यांची जनजागृती करणे, पंचायत राज व्यवस्थेची महिलांना माहिती देणे, शासकीय योजनेचा लाभ मिळण्याकरिता सुकरता यावी, यासाठी उमेद अभियानाची निर्मिती करण्यात आली आहे. याच धर्तीवर निसर्गाने नटलेल्या आणि विपुल सुबकता लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचतगट समुहाच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. या महिला उमेद अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध लाभांचा फायदा उठवत विविध व्यवसाय करीत आहेत. यातील उत्कृष्ट काम करीत असलेल्या काही समुहांच्या यशस्वीतेचा घेतलेला आढावा.....
.......................

नांदोस : भाग १

पारंपरिक ‘टोपली’ला दिली व्यावसायिक ओळख
नांदोसमधील समूहः नव्या संकल्पनेला ग्राहकांचा प्रतिसाद
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः बांबूपासून शोभेच्या आकर्षक वस्तू बनवणे, हा एक व्यवसाय बनला आहे. याला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. बाजारपेठेतील ही मागणी लक्षात घेऊन नांदोस (ता.मालवण) येथील पूजा महिला स्वयंसहायता समुहाने बनविलेल्या वस्तूंना चांगलीच मागणी वाढली आहे. बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या पारंपरिक पडली, टोपली यामध्ये नायलॉनचा वापर करीत आकर्षक पडली बाजारात या समुहाने आणली आहे. या पडली, टोपलीमुळे समुहाच्या उत्पादनाला बाजारात पसंती मिळत असून कणकवली येथे सुरू करण्यात आलेल्या ''उमेद मार्ट''मध्येही ग्राहकांची मागणी वाढताना दिसत आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत सुकळवाड प्रभागातील नांदोस गावातील पूजा महिला स्वयंसहायता समूह कार्यरत आहे. समुहाची निर्मिती करण्याच्या हेतूने एकत्र येत नांदोस गावातील १४ महिलांनी २४ ऑगस्ट २०१९ ला पूजा महिला स्वयंसहायता समुहाची स्थापना केली. महिलांनी बचतीच्या माध्यमातून चालविलेल्या या समुहाने दशसूत्रीच्या आधारे पुढे वाटचाल सुरू केली आहे.
हा समूह गेली सहा वर्षे नियमित कार्यरत असून दर आठवड्याला बैठक घेतली जाते. समुहाने दोन वेळा बँक कर्ज उचल करून त्याची नियमित परतफेड केली आहे. समुहातील महिलांचा गावातील स्वच्छतेच्या कामात नेहमीच हातभार असतो. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित हिमोग्लोबिन तपासणी केली जाते. ग्रामसभेतही त्यांचा नियमित सहभाग असतो. समुहाच्या माध्यमातून बांबूपासून शोभेच्या आकर्षक वस्तू बनविण्याचा व्यवसाय केला जातो.
पूजा समुहाने अंतर्गत कर्जावरील व्याज, व्यवसायातील नफा, शासकीय निधी यांच्या जोरावर आर्थिक वाटचाल करण्यास सुरुवात केली. उमेद अभियानाकडून तीस हजार रुपये एवढा फिरता निधी मिळाला आहे. तसेच साठ हजार एवढा समुदाय गुंतवणूक निधी मिळाला आहे. तयार केलेल्या बांबूच्या शोभिवंत वस्तूंपासून समुहाला एक लाख ८५ हजार रुपये एवढा नफा प्राप्त झालेला आहे. त्यासाठी आवश्यक कच्चामाल स्थानिक बाजारपेठ व शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. या उत्पन्नाची विक्री कणकवली येथील उमेद मार्ट आणि मालवण, कुडाळ, कणकवली येथील स्थानिक बाजारपेठेमध्ये केली जाते.
समुहाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठेत मागणी वाढती राहिली आहे. त्यामुळे महिलांचा उत्साह वाढला आहे. त्यांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ऊर्जा प्राप्त झाली आहे. अशा पद्धतीने आर्थिक उलाढाल करत गेली सहा वर्षे आपली घोडदौड कायम ठेवत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांचा यशस्वी समुहांत समावेश झाला आहे. त्यांचे प्रयत्न फळाला आले असून, लक्षवेधी काम केले आहे. अध्यक्षा सुनयना गावडे, सचिव संगीता माने, खजिनदार शुभांगी गावडे आणि अन्य अकरा सदस्य यांच्या अथक मेहनतीतून हा व्यवसाय बहरत आहे. यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक रवीकिरण कांबळी, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार आणि अन्य अधिकाऱ्यांचे सहकार्य या समुहाला लाभत आहे.

चौकट
अभियान व्यवस्थापकांची भेट
या समुहाला तालुका व जिल्हा स्तरावरून विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली आहेच; परंतु त्यांच्या यशस्वीतेची दखल घेत राज्यस्तरावरून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापक प्रशांत पाटील यांनी भेट दिली आहे. पाटील यांनी समुहातील महिलांचे कौतुक करीत व्यवसायातील घौडदौड कायम सुरू ठेवावी, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

कोट
पूजा स्वयंसहायता समूह उमेद अभियान अंतर्गत स्थापन झालेला आहे. आम्ही बांबूपासून टोपली, फुलाची परडी, फुलदाणी तसेच वेगवेगळ्या शोभिवंत वस्तू बनवितो. कच्च्या मालासाठी गावातून स्थानिक बांबू खरेदी केला जातो. कराड-इस्लामपूरमधून प्लास्टिक वायर खरेदी केली जाते. आमच्या समुहातील सहा सदस्य बांबूपासून वस्तू बनवितात व स्थानिक बाजारपेठेमध्ये आणि शहरांमध्ये मालविक्री करतात. समुहाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ८५ हजार रुपये एवढा निव्वळ नफ्यात आहे. या व्यवसायामुळे गटातील प्रत्येक महिलेच्या हाताला रोजगार मिळाला आहे. घरची आर्थिक परिस्थिती सुधारली असून आत्मविश्वास मिळाला आहे. बांबू हा आमच्यासाठी फक्त एक कच्चा माल नाही तर, स्वावलंबनाचा आधारस्तंभ बनला आहे. आज आम्हाला अभिमान वाटतो की, आम्ही पर्यावरणपूरक वस्तू बनवून समाजात योगदान देत आहोत. महिला एकत्र आल्या आणि विश्वासाने पावले उचलली तर काहीही अशक्य नाही. आमच्या या प्रवासात साथ देणाऱ्या सर्व संस्था, ग्राहक आणि समाजातील लोकांचे आभार मानतो.
- सुनयना गावडे, अध्यक्ष, पूजा स्वयंसहायता समूह.
...........................
चौकट
नाव : पूजा महिला स्वयंसहायता समूह
स्थापना : २४ ऑगस्ट २०१९
सदस्य संख्या : १४
प्रभाग : सुकळवाड
गाव : नांदोस
तालुका : मालवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com