-सांस्कृतिक केंद्राअभावी कला क्षेत्रास खीळ

-सांस्कृतिक केंद्राअभावी कला क्षेत्रास खीळ

Published on

सांस्कृतिक केंद्राअभावी कलाक्षेत्रास खीळ
मंडणगड तालुका ; प्रशिक्षण, पायाभूत सुविधा नसल्याने प्रतिभेवर अन्याय
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः सांस्कृतिक केंद्रांअभावी तालुक्यातील कलाक्षेत्राला खीळ बसली आहे. दापोली मतदारसंघात खेड येथे परिपूर्ण सांस्कृतिक केंद्रांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यानंतर दापोली तालुक्यात सांस्कृतिक केंद्र निर्मितीसाठी निधीची घोषणा झाली. या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्याची सांस्कृतिक केंद्रांची मागणी केव्हा पूर्ण होणार याची तालुकावासियांना मोठी प्रतीक्षा आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांची मूळ गावे असलेल्या या तालुक्यातील साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात सुप्त प्रतिभा दडलेली आहे. मात्र तिला प्रवाहित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची जसे प्रशिक्षण, सांस्कृतिक केंद्रे यांची सुरुवातीपासून मोठी वानवा आहे. विविध प्रांतात उच्चस्तरावरील यश मिळवण्यासाठी केवळ निसर्ग दत्त प्रतिभा पुरेशी नाही. त्यासाठी साधना व योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. यासाठी दापोली, खेड, महाड, गोरेगाव सारख्या तालुक्यांची आजही मदत घ्यावी लागते. प्रचलित काळात शाहीर जयराम देशमुख, नटवर्य अण्णासाहेब जावडेकर, शाहीर विश्वजित लोखंडे, विजय जाधव, संगीत संयोजक मुकंद तांबे, नीलेश लांबे, ढोलकीपटू सिद्धेश धाडवे, गायक गीतकार नयन गमरे, गायक दीप जोशी, अभिनेत्री गौरी किरण ही नावे कलेच्या प्रातांत नाव गाजलेली व्यक्तिमत्त्वे मंडणगडच्या मातीतून स्थलांतरित होऊन आपल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. गौरी गणेश नृत्य व तमाशाचे क्षेत्रात गुरू शिष्य व घराण्यांची पंरपरा येथे जोपासली गेली असली तरी कलेचा उत्कर्ष व गुणवत्ता वाढवण्यासाठी फारच कमी प्रयत्न होताना दिसून आले आहेत. युवा प्रतिभा फुलावी यासाठी प्रतिभेस जोड देण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण व कार्यानुभव मिळण्यासाठी आवश्यक असणारे व्यासपीठ येथे उपलब्ध नाही. निदान धोरणात्मक निर्णयाचा लाभ म्हणून सर्व सोईसुविधा युक्त सांस्कृतिक केंद्र शहराचे ठिकाणी असावे, अशी तालुक्यातील कलाकारांची मागणी आहे. शहरासह तालुक्यात राजकीय सभा, व्यावसायिक नाटके, संगितीक व सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या आयोजनासाठी आवश्यक असणारे व सर्व सोयीसुविधा असलेला एकही हॉल सभागृह वा सांस्कृतिक केंद्र उपलब्ध नाही ही फारच गंभीर बाब आहे.
महाविद्यालयाचे स्थापनेनंतर तालुक्यात उच्च शिक्षणाचे सार्वत्रीकरण झाले आहे हे बाब लक्षात घेता आजूबाजूच्या तालुक्यातील नाटके व सांस्कृतिक कार्यक्रमांना तालुकावासियांची मोठी हजेरी असल्याचे दिसून येत असल्याने तालुक्याचे ठिकाणी सांस्कृतिक केंद्रांची निर्मितीसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

चौकट
दिग्गज कलाकारांची उपस्थिती
साहित्य कला, क्रीडा व संगीत या क्षेत्रांना तालुकावासियांनी आश्रय दिला आहे. त्यामुळे यापूर्वी येथे निळू फुले, अशोक सराफ, विजय कदम, शरद तळवलकर, राम नगरकर, शौनक अभिषेकी, मधुमती दांडेकर, शाहीर विठ्ठल उमप यांच्या सारख्या अनेक मोठ्या कलाकारांनी आपली कलाही सादर केली आहे. मध्यंतरीच्या काळात सोयीसुविधा वा आर्थिक गणिते यांचा मेळ बसत नसल्याने शहराचे ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन ठप्प झाले हे खरे असले तरी गेल्या दहा वर्षात तालुकावासीयांचा ओढा कलेच्या प्रांताकडे वळला आहे.
--------
कोट
मंडणगड शहरात व्यावसायिक नाटके, ऑकेस्ट्रा, संगीत कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे रंगमंच, आसन क्षमता, ध्वनी व्यवस्था अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण सभागृह नाही. त्याचा तोटा सांस्कृतिक चळवळीस बसला आहे. नगरपंचायतीने यासाठी कालसंगत नाट्यगृह उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
-अतुल पवार, अभिनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com