ःचिपळूण बसस्थानकाच्या बांधकामासाठी नवा ठेकेदार

ःचिपळूण बसस्थानकाच्या बांधकामासाठी नवा ठेकेदार

Published on

-ratchl८२.jpg-
P२५N९०२०८
चिपळूण ः मध्यवर्ती बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाची सुरुवात श्रीफळ वाढवून करण्यात आली.
----
चिपळूण बसस्थानकाच्या कामाला नवी गती
नवा ठेकेदाराकडून कामाचा प्रारंभ ; काम रखडल्याने प्रवाशांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः येथील सहा-सात वर्षांपासून रखडलेल्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकाच्या कामाला आता नव्याने चालना मिळणार आहे. एसटी महामंडळाने नियुक्त केलेल्या नव्या ठेकेदाराला बांधकामासाठीचे आदेश मिळाले आहे. सुरुवात ते शेवट या पद्धतीने बांधकामाला सुरुवात होणार असून त्या कामाला श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली.
शहरात मध्यवर्ती बसस्थानकानकाची जीर्ण इमारत तोडून तेथे अत्याधुनिक बसस्थानक बांधण्याला काही वर्षापूर्वी सुरुवात झाली. ठेकेदार व एसटी महामंडळाच्या कुचकामी भूमिकेमुळे या बसस्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ उडाला होता. त्यामुळे अनेक वर्ष होऊनही बसस्थानकाचे बांधकाम रखडले होते. हे बांधकाम मार्गी लागावे यासाठी अनेकांनी आंदोलने केली. दोन ठेकेदारांनी काम अर्धवट सोडून दिल्यामुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. बांधकाम मार्गी लागत नसल्याने प्रवाशांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुरुवातीला इमारतीचा पाया, त्यानंतर पहिल्या मजल्याचा स्लॅबचे पूर्ण झाले. बांधकामाची गती लक्षात घेता लवकरच बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाईल, अशीच अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र पहिल्या स्लॅबच्या कामानंतर उर्वरित बांधकाम कित्येक महिने रखडले. बसस्थानकाच्या उर्वरित २ कोटी ८७ लाखांच्या कामासाठी एसटी महामंडळाकडून पुन्हा निविदा प्रकिया राबवण्यात आली. आता त्याचा ठेका स्थानिक ठेकेदाराला मिळाला आहे. याच ठेकेदाराने शहरातील शिवाजीनगर येथील काँक्रिटीकरणाचे काम वेळेत मार्गी लावले होते. यापूर्वी परजिल्ह्यातील ठेकेदारांची नियुक्ती झाली होती. आता नव्या ठेकेदाराला कामाचे आदेश महामंडळाकडून देण्यात आले आहेत. लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे.

चौकट
आता काम पूर्ण होण्याची अपेक्षा
रखडलेल्या बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आजवर अनेक ठेकेदार होऊन गेले. त्या-त्या वेळी बांधकामाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडला गेला. मात्र त्यापैकी एकाही ठेकेदाराने बसस्थानकाचे बांधकाम वेळेत पूर्ण केले नाही. सध्याच्या नियुक्त केलेला ठेकेदार तरी हे काम पूर्ण करेल अशी अपेक्षा प्रवाशांना आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला आगारप्रमुख दीपक चव्हाण, अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष सतीश खेडेकर, अमोल मोहिते, अस्मित पाथरे आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com