मोकाट गुरांबाबत मालकांवर कारवाई करा
-rat८p२०.jpg-
२५N९०२१०
राजापूर ः मोकाट गुरांबाबत पोलिस निरीक्षक अमित यादव यांना निवेदन देताना राजापूरवासीय.
---
‘त्या’ गुरांच्या मालकावर कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात मोकाट गुरांचा वावर असतो. त्यामुळे रस्त्यातून ये-जा करणाऱ्या जनावरांना भरधाव धावणाऱ्या वाहनांची धडक होऊन अनेकवेळा अपघात होतात. त्यामुळे महामार्गाने फिरणाऱ्या मोकाट गुरांचा बंदोबस्त व्हावा आणि गुरांच्या मालकांवर कारवाई करावी, असे निवेदन स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे.
महामार्गावरील तालुक्यातील हातविले येथील टोलनाका येथे एकत्रित आलेल्या सर्वांनी मोकाट गुरांच्या बंदोबस्ताबाबतचे निवेदन महामार्ग विभाग आणि राजापूर पोलिसांना दिले आहे. या वेळी अशफाक हाजू, दीपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, संदीप राऊत, प्रसाद मोहरकर, कोदवली सरपंच प्रणोती भोसले, हातिवले सरपंच नाना गोटम, प्रशांत जोशी, नाना पवार, दीपक धालवलकर, अजित घाणेकर, महेश कारेकर, प्रशांत मोंडकर, रवींद्र सावंत, सुरज मोरे आदी उपस्थित होते.,