सुजित फडकेंचे सेट परीक्षेत यश
swt८१५.jpg
९०२२४
सुजित फडके
सुजित फडकेंचे
सेट परीक्षेत यश
देवगड, ता. ८ः चालूवर्षी घेण्यात आलेल्या अधिव्याख्याता पात्रता (सेट) परीक्षेत जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमधील शिक्षक सुजित फडके उत्तीर्ण झाले. त्यांनी भौतिकशास्त्र (फिजिक्स) या विषयात यश संपादन केले आहे. या परीक्षेला महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण ९० हजार ३६६ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६ हजार ५० परीक्षार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ६.६९ टक्के लागला. श्री. फडके यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अॅड. अजित गोगटे, कार्यवाह प्रवीण जोग, मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
...................
swt८१६.jpg
90225
प्रा. प्रतीक्षा हिंदळेकर
प्रा. प्रतीक्षा हिंदळेकर यांना
रसायनशास्त्रमध्ये पीएचडी
तळेरे, ता. ८ः मुळची तळेरे येथील आणि सध्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका प्रा. प्रतीक्षा हिंदळेकर यांना विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
या संशोधनासाठी त्यांना के. सी. कॉलेज, मुंबई येथील प्राध्यापक डॉ. राजेश सामंत तसेच दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विजय गुरव, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.जी. गोरे, माजी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे व विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.