कळसुली ''नाईटिये'' मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
90229
कळसुलीत ‘नाईटिये’तर्फे
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ८ ः कळसुली येथील नाईटिये देवी सांस्कृतिक मंडळाने श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शैक्षणिक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
मंडळाचे सचिव राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला दखल देत मंडळाने त्यांचा सत्कार केला. यावेळी दर्पण दत्तात्रय पारधिये, अनुप हेमंतकुमार परब, साई संदीप ताम्हाणेकर, अथर्व हेमंतकुमार परब शाखा, आर्या लक्ष्मण परब यांना विशेष प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे आणि आवश्यक असल्यास आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले.
ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत पारधिये, दिलीप सावंत, शंकर पारधिये, भजनी बुवा सचिन पारधिये, बाळा मेस्त्री, पंढरी हुले, विठ्ठल आर्डेकर, रुपेश ताम्हाणेकर, प्रवीण पारधिये, हेमंतकुमार परब, सुहास काणेकर, गोपाळ म्हाडेश्वर, बबन काणेकर, कृष्णा कृपाळ, अनिल म्हाडेश्वर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी सुहास काणेकर, अक्षय म्हाडेश्वर, पंढरी हुले, कृष्णा कृपाळ, राजेंद्र द. पारधिये, बुवा सचिन पारधिये यांनी आर्थिक मदत केली. तसेच, रमेश निळकंठ पारधिये यांच्या दातृत्वातून मंडळाला ढोलकी देणगी प्राप्त झाली. यापूर्वी त्यांनी गणवेशासाठीही एक हजार रुपये देणगी दिलेली होती. कळसुली सरपंच सचिन पारधिये यांनी मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेत आर्थिक मदत केली. मंडळाचे अध्यक्ष वैभव पारधिये यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले व उपस्थितांचे आभार मानले.