दागिने चोरीप्रकरणी
तीन महिला ताब्यात

दागिने चोरीप्रकरणी तीन महिला ताब्यात

Published on

दागिने चोरीप्रकरणी तिघी ताब्यात
कुडाळातील घटना ः बसस्थानकात झाली होती चोरी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः येथील बसस्थानकात सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे महिलेचे सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी तीन महिलांना कुडाळ पोलिसांनी अटक केली. तिन्ही महिला परजिल्ह्यातील असून, त्या रविवारी (ता. ७) कुडाळ बसस्थानकात संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत संशयित म्हणून गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रूपाली पिंटू चौगुले, सपना समशेर चौगुले आणि दीपाली चौगुले अशी त्यांची नावे आहेत.
येथील बसस्थानकात १ सप्टेंबरला ही चोरी घडली होती. पणजी ते पुणे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना पुणे येथील सुलभा मारुती लोंढे यांचे मंगळसूत्र व एक नथ असे सुमारे १ लाख ८ हजारांचे दागिने चोरट्याने पळविले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बसस्थानकात अशा चोऱ्या वाढल्यामुळे पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे सुरू केले. त्यानंतर रविवारी काही महिला बसस्थानकात संशयास्पद वर्तन करतना आढळल्या. त्या गर्दीत ये-जा करत होत्या. पोलिसांना या महिलांवर संशय आला आणि त्यांनी त्वरित त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. रूपाली पिंटू चौगुले, सपना समशेर चौगुले आणि दीपाली चौगुले यांच्यावर पूर्वीही अन्य जिल्ह्यांत चोरीचे गुन्हे नोंदले आहेत. पोलिसांच्या झडतीत त्यांच्याकडे इतर व्यक्तींची आधार कार्ड आणि एटीएम कार्ड सापडली आहेत, ज्यामुळे बसस्थानकातील चोरीशी त्यांचा संबंध असल्याची शक्यता वाढली आहे. येथील पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी, पोलिसांची तत्परता अशा प्रकारच्या चोरींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरेल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com