-मतदारसंघाने सर्वाधिक बक्षिसे मिळवावीत
- rat९p४.jpg-
२५N९०३०९
दापोली ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत दापोली येथे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री योगेश कदम.
---
‘पंचायतराज अभियानात’ दापोली सरस व्हावी
योगेश कदम ः सर्वाधिक बक्षीसे मिळवा, गावोगावी विकासाची चळवळ
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ९ : समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे दापोली मतदार संघाने मिळवावीत, अशी अपेक्षा या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली.
ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दापोली–मंडणगड व खेड तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन दापोली येथे करण्यात आले. सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या वेळी कदम म्हणाले, लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा आहे. राज्यभरातील तालुकास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर तब्बल ३०० कोटी रुपयांची बक्षिसे वितरित होणार आहेत. आपल्या मतदार संघातील ग्रामपंचायतींनी ठोस नियोजन करून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मिळवावीत यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबवले जाणार असून, या काळात प्रत्येक ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाली पाहिजे. स्वच्छता, पाणीपुरवठा, शाश्वत विकास, डिजिटल ग्रामपंचायत, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केल्यास ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर बक्षिसे मिळणार आहेत. या माध्यमातून गावोगाव विकासाची नवी चळवळ उभी राहील.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक व सुनील खरात, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई व दीप्ती निखारगे, शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील शेकडो सरपंच व ग्रामसेवक यांची उपस्थितीही लक्षणीय होती. या कार्यशाळेमुळे ग्रामविकासाला एक नवे दिशादर्शन मिळाले असून, आगामी तीन महिन्यांत मतदार संघातील ग्रामपंचायतींमध्ये बक्षिसे मिळवण्यासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
---
चौकट
पायाभूत सुविधा मजबूत होतील
ग्रामपंचायतींनी आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या योजनांची अंमलबजावणी कशी करावी याबाबत दिशा दाखवण्यात आली. या अभियानातून गावागावातील पायाभूत सुविधा मजबूत होऊन नागरिकांना थेट लाभ मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.