सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेला मदतीचा हात

सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेला मदतीचा हात

Published on

rat९p५.jpg-
२५N९०३१०
रत्नागिरी : सोमेश्वर शांतीपिठाच्या विश्वमंगल गोशाळेला फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मदत देण्यात आली. त्या प्रसंगी उपस्थित कंपनीचे रामबाबू सांका, सत्यब्रत नायक, नरेश खेर, अभिषेक साळवी आणि गोशाळेचे संचालक
---
गाईंच्या पोषणासाठी उद्योग-फाउंडेशन एकत्र
चाऱ्यासह पशुखाद्याची मदत; फिनोलेक्स, मुकुल माधवतर्फे गोशाळेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपिठाच्या विश्वमंगल गोशाळेतील गायी-वासरांसाठी दरमहा चारा व पशुखाद्याची मदत करण्यात येत आहे. याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच गाई-गुरे, घोडे व प्राणी, पक्ष्यांसाठी मदत करत आहेत. यापूर्वी फाउंडेशनतर्फे पुण्यामधून ६००पेक्षा जास्त गाईंना चारा व निवारा, कोविडच्या काळात ४५० पेक्षा घोडेमालकांना खाद्यस्वरूपात मदत, गुजरातमध्ये मकरसंक्रांतींवेळी पतंगामुळे होणाऱ्या पक्ष्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार व १२ हजारापेक्षा जास्त ऑलिव्ह रिडले कासव अंडी संवर्धन केंद्राला मदत करण्यात आली आहे.
प्राणी कल्याणकारी संस्था पीपल फॉर अॅनिमल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेला पाठिंबा देण्यासाठी एक करार केला आहे. या अंतर्गत गोशाळेत असलेल्या ७० गाई, वासरांसाठी दरमहा चाऱ्याची व पशुखाद्याची सोय केली जाणार आहे. या उपक्रमामुळे गोशाळेवरील दैनंदिन चाऱ्याचा ताण कमी होईल तसेच गाईंचे नियमित पोषण होईल. त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि त्या निरोगी राहतील. चांगल्या पोसलेल्या गाई स्थानिक परिसंस्था व समाजाला सकारात्मक योगदान देतात.
विश्वमंगल गोशाळेत चाऱ्याचे व पशूखाद्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सोमेश्वर शांतीपिठाचे अध्यक्ष राजेश आयरे, संचालक अनुजा पेटकर, विनोद पेटकर, स्नेहल वैशंपायन, राकेश वाघ, दाते, तेंडुलकर व फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रामबाबू सांका, सत्यब्रत नायक, नरेश खेर, अभिषेक साळवी आदी उपस्थित होते.
----
चौकट १
सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी येथे विश्वमंगल गोशाळा या गोशाळेत सध्या ७० गाईंचे संगोपनाचे काम सुरू आहे. रत्नागिरी शहरातील भटक्या व बेवारस गाईंच्या संगोपनाचे येथे काम केले जाते. गोशाळेची स्थापना दोन वर्षांपूर्वी अक्षय तृतीयेला करण्यात आली. टप्प्याटप्प्याने रत्नागिरी शहर परिसरातील गाईंचे संगोपन करण्याचे काम सुरू केले. सध्या गोशाळेच्या परिसरामध्ये विविध औषधी लागवडीचे हे काम सुरू आहे. गोशाळेला समर्थरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनने चाऱ्याची व्यवस्था केल्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत, असे अध्यक्ष राजेश आयरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com