अंकिता कर्लेकर प्रथम विजेत्या

अंकिता कर्लेकर प्रथम विजेत्या

Published on

rat९p७.jpg-
P२५N९०३१२
रत्नागिरी : भाजपच्या गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्या अंकिता कर्लेकर व कुटुंबीयांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देताना शहराध्यक्ष दादा ढेकणे, नीलेश आखाडे व सहकारी.
----
गणेश सजावट स्पर्धेत
अंकिता कर्लेकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : भाजपचे रत्नागिरी शहर सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन गणेशोत्सव सजावट स्पर्धेत मारुती मंदिर, कर्लेकरवाडीतील अंकिता कर्लेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आपल्या घरातील दोन खोल्यांमध्ये कागदाचा वापर करून गणरायासाठी सजावट केली होती. श्रीकृष्णरूपातील गणपती बाप्पा व तयार करण्यात आलेली गुहा यांचा सुंदर मेळ या पर्यावरणपूरक सजावटीत पाहायला मिळाला. त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
गणेशभक्तांनी बाप्पाची मूर्ती अधिक आकर्षक पर्यावरणपूरक करावी, या उद्देशाने आखाडे यांनी स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्र. ६ व ७ साठी केले होते. स्पर्धेमध्ये द्वितीय क्र. श्रेयस मयेकर (गौरीश अपार्टमेंट, पॉवरहाऊस) यांना मिळाला. त्यांनी विठ्ठलरूपातील गणेशमूर्ती, संत गोरा कुंभार यांची विठ्ठलभक्ती या संकल्पनेसह सजावट केली. संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक होती. प्रतापगड जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर झाले. याच विषयावर आधारित पॉवरहाऊस येथील प्रा. सचिन टेकाळे यांनी आपल्या कौशल्यातून पर्यावरणपूरक सजावट केली होती. त्यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. स्पर्धेत उत्तेजनार्थ अॅड. विजय पेडणेकर (विश्वनगर), गुरुप्रसाद फाटक (हिंदू कॉलनी), विश्वेश भिडे (चैतन्य नगर) आणि सुरेश फटकरे (राजेंद्रनगर) यांना देण्यात आला. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रथम क्र. ३ हजार ३३३, द्वितीय २ हजार २२२, तृतीय क्रमांकास १ हजार १११, उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०१ रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, सरचिटणीस नीलेश आखाडे व सरचिटणीस संदीप सुर्वे, प्रज्ञा टाकळे, मनोज कोळवणकर, भिंगार्डे, प्रवीण रूमडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com