लांजातील तरुणाने केला पाच हजार नाण्यांचा संग्रह

लांजातील तरुणाने केला पाच हजार नाण्यांचा संग्रह

Published on

-rat९p१५.jpg-
२५N९०३६९
चिन्मय बेर्डे
-rat९p१६.jpg, rat९p१७.jpg, rat९p१८.jpg, rat९p१९.jpg-
२५N९०३७०, २५N९०३७१, २५N९०३७२, २५N९०३७३
लांजा ः चिन्मय बेर्डेने केलेला भारतीय व परदेशी नाणी व नोटांचा संग्रह.
----
लांजातील तरुणाने केला पाच हजार नाण्यांचा संग्रह
चिन्मय बेर्डेंचे संग्रहालयाचे स्वप्न; परदेशी नोटांचा समावेश, नाणकशास्त्रात पदवीची इच्छा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ९ ः रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील चिन्मय बेर्डे या युवकाने भारतीय व परदेशी नाणी व नोटांचा संग्रह करण्याचा एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. नुकताच त्याच्या संग्रहातील पाच हजार नाण्यांचा टप्पा पूर्ण झाला असून, ३०० परदेशी नोटांचाही त्यात समावेश आहे. चिन्मय उच्चशिक्षित असून, भविष्यात त्याला शिक्षणासह नाणक शास्त्रामध्ये पदवी प्राप्त करून स्वतःचे नाणी संग्रहालय उभारण्याचे त्याचे स्वप्न आहे.
चिन्मयच्या संग्रहात ६५पेक्षा जास्त देशातील ५ हजार चलनी नाणी आणि ३०० नोटा आहेत. (अमेरिका, चीन, जपान, मलेशिया, पनामा सिटी, न्युझिलंड, थायलंड, सिशेल्स, युरोप, चिली, पेरू इ.) याचसोबत काही देशातील विशेष नाणीदेखील संग्रहात आहेत. हा छंद जोपासताना जबाबदारीचे काम असल्याने नाणी व नोटा खराब होऊ शकतात. त्यांची निगा राखणे गरजेचे असते. नाण्यांवर बारीकबारीक अनेक सूक्ष्मजंतू बसून नाणी खराब होतात. ते होऊ नये यासाठी सापाची ताजी कात किंवा वेखंडाच्या लहान लहान पुरचुंड्या करून त्या नाणी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ठेवल्या जातात. नाणी ठेवण्यासाठी कॉईन होल्डर आणि पेजेस एकदम घेऊन प्रत्येक नाण्याच्या आकारानुसार फोल्डरमध्ये ठेवले जाते आणि सगळा बंच फाईलमध्ये लावतो. नोटांसाठी साधे फोल्डर किंवा बँकनोट्स होल्डरचा वापर चिन्मय करतो.
---
चौकट
शिवराई हे ऐतिहासिक नाणे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील ‘शिवराई’ हे ऐतिहासिक नाणेदेखील आहे. हे तांब्याचे नाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी ते चलनात आणले होते. १९२० पर्यंत हे नाणे चलनात होते. ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले. ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला; पण अजूनही काही शिवराया नदीतील वाळूत किंवा जमिनीत सापडतात. हे तांब्याचे नाणे साधारण ११-१३ ग्रॅमचे असते. एका बाजूस श्री/राजा शिव तर दुसऱ्या बाजूस छत्रपती असे लिहिलेले असते. यास पूर्ण शिवराई असेही संबोधिले जाते.
-----
चौकट
परदेशी नाणे पाहून संग्रह सुरू
चिन्मयला बालपणापासूनच या छंदाची आवड निर्माण झाली. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच या छंदाविषयी गोडी निर्माण झाली. त्याच्या एका मित्राकडून त्याला असं कळलं की, परदेशात रुपयाऐवजी काही वेगळे पैसे असतात. पैशाचं स्वरूप वेगळे असते. त्यानंतर जेव्हा खराखुरा डॉलर त्याने बघितला त्या वेळी त्याला आपण असे अनेक डॉलर जमा करावेत, असे वाटले. परदेशी नाण्यांचे वेगळेपण पाहून त्याने त्यांचा संग्रह सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com