फॅन्सी ड्रेस उपक्रमास मिलाग्रीसमध्ये प्रतिसाद

फॅन्सी ड्रेस उपक्रमास मिलाग्रीसमध्ये प्रतिसाद

Published on

swt101.jpg
90549
सावंतवाडीः मिलाग्रीस प्रशालेत फॅन्सी ड्रेस उपक्रमात संत, महान व्यक्ती यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या.

फॅन्सी ड्रेस उपक्रमास
मिलाग्रीसमध्ये प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः येथील मिलाग्रीस प्रशालेमध्ये फॅन्सी ड्रेस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मराठी प्रायमरी, इंग्लिश प्रायमरी व हायस्कूलमधील तब्बल १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध धर्मांमधील संत, महान व्यक्ती यांच्या वेशभूषेतून सर्वधर्मसमभावाची संकल्पना विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये रुजविली.
विविध धर्मांतील संतांची वेशभूषा तसेच त्यांनी समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वीकारलेली विचारधारा या अनुषंगाने उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी संतांचे विचारही या वेशभूषेअंतर्गत सादर केले. सूत्रसंचालन नीलराज सावंत यांनी मानले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका क्लिटा परेरा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी आदी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सालदान्हा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Marathi News Esakal
www.esakal.com