सावंतवाडीत ''श्रीं''चरणी ५ हजार मोदक

सावंतवाडीत ''श्रीं''चरणी ५ हजार मोदक

Published on

swt1015.jpg
90606
सावंतवाडीः वैश्यवाडा हनुमान मंदिरात ५ हजार १२१ मोदकांचा नैवेद्य श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला.

वैश्‍यवाड्यात ‘श्रीं’चरणी
पाच हजार मोदक
सावंतवाडीः वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात २१ दिवसांचा सार्वजानिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व भक्तिमय वातावरणात सुरू आहे. गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने येथील भाविकांनी सुमारे ५ हजार १२१ मोदकांचा नैवेद्य श्रींच्या चरणी अर्पण केला. गणेशोत्सवातील संकष्टी निमित्त सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. गौरेश मिशाळ यांनी श्रींची पूजा केली. गणेशोत्सवात रोज भजनासह धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. आज ५ हजार १२१ मोदकांचा नैवेद्य श्रींचरणी अर्पण करण्यात आला. यावेळी दीपक म्हापसेकर, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, अण्णा म्हापसेकर, सुरेश भोगटे, महावीर चेंडके, सुभाष आळवे, धोंडी दळवी, शरद सुकी, महादेव गावडे, मंगेश परब, प्रकाश मिशाळ, प्रकाश सुकी, वैभव म्हापसेकर, नरेश जीवने, डॉ. दादा केसरकर, संजय म्हापसेकर, वैशाख मिशाळ, सतीश नार्वेकर, महेश म्हापसेकर, अंकिता नेवगी, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com