एकपात्री स्पर्धेत शिवगण तृतीय
एकपात्री स्पर्धेत
शिवगण तृतीय
पाली ः मुंबई विद्यापिठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने ५८व्या युवा महोत्सव दक्षिण रत्नागिरी जिल्हास्तरीय प्राथमिक फेरीत डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालयाचा सिद्धेश शिवगण या विद्यार्थ्याने एकपात्री (मराठी) स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्याने ‘जत्रा’ नावाचा एकपात्री प्रयोग सादर केला. या प्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक नंदकुमार जुवेकर यांनी केले होते. त्याचबरोबर त्यांचे सहकारी परवेझ गोलंदाज यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णा सामंत, उपाध्यक्ष महेश सामंत यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कांता कांबळे व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंतिम स्पर्धा १९ रोजी मुंबई येथे होणार आहे. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सिद्धेश शिवगण हा अधिक तयारी करत आहे.
वालावलकर महाविद्यालयात
प्राध्यापकांचा सन्मान
सावर्डे : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त वालावलकर मेडिकल कॉलेजमध्ये गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. वालावलकर रुग्णालय आणि रोगनिदान केंद्र ही सेवाभावी संस्था असून, त्यांचे दातृत्व वाखाणण्याजोगे आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेकांचे कल्याण होत आहे. इतर संस्थांमध्ये साठीनंतर तुम्हाला सेवानिवृत्त केले जाते अथवा कमी पगारात नोकरी करावी लागते; पण इकडे असे न करता सगळ्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. संस्था आपले सर्व उत्पन्न शिक्षकवर्ग, विद्यार्थी व सामाजिक काम यासाठी खर्च करते, ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे, असे डॉ. शशिकांत धुमाळे यांनी सांगितले. या वेळी डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. अरविंद यादव, डॉ. अनघा मोडक, डॉ. चेतन जावसेन, डॉ. गजानन वेल्हाळ, डॉ. आनंद गजकोष, डॉ. प्रतीक शहाणे, डॉ. राजीव केणी, डॉ. प्रशांत मूल्या यांचा सन्मान करण्यात आला.
rat१०p५.jpg-
P२५N९०५४७
अपर्णा सावंत
आदिशक्ती समितीच्या
अध्यक्षपदी सावंत
रत्नागिरी ः महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या आदिशक्ती अभियांतर्गत शहरानजीकच्या मिऱ्या ग्रुपग्रामपंचायतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आदिशक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्याध्यापिका अपर्ण सावंत यांची निवड करण्यात आली आहे. महिलांना त्यांचे असलेले अधिकार आणि कर्तव्याविषयी माहिती देऊन त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम बनवणेसाठीचा समितीचा प्रामुख्याने शासनाने विचार केला आहे. यासाठी गावातील सर्व महिलांचा या अभियानात सहभाग असावा, ही शासनाची माफक अपेक्षा आहे. या अभियानात सर्व महिलांनी स्वेच्छेने सहभाग घेऊन पुढे येण्याची विनंती समिती अध्यक्षांनी सर्व महिलांनी केली आहे. तसेच गुरुप्रसाद माने, जयंत नार्वेकर, मानसी सावंत, पूर्वा डोर्लेकर, पायल चव्हाण, संगीता आंबेरकर, हरिश्चंद्र माने आदी ग्रामस्थांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.