युती न झाल्यास स्वबळावर सज्ज
-rat१५p२१.jpg-
२५N९१६५६
संगमेश्वर ः हातीव येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना आमदार शेखर निकम.
----
युती न झाल्यास स्वबळावर सज्ज
शेखर निकम ः हातीव-मोर्डे राष्ट्रवादीचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः महायुती झाली तर सन्मानाने जागांचा तोडगा निघावा. आम्हाला आमच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत. कमी लेखले जाऊ नये; मात्र युती झाली नाही तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा वांझोळे येथे झाला. मेळाव्यात प्रदीप कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास त्या जिंकून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. मेळाव्याला जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, माजी सभापती पूजा निकम, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, माजी सभापती विजय गुजर आदी उपस्थित होते.
आमदार शेखर निकम म्हणाले, २०२९च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करू नका, आपलं काम करत राहा. आता युती होईल की नाही, हे आता सांगता येत नाही. झाली तर ठीकच; पण नाही झाली तरी आपण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवूया.
चौकट
२०२४ सारखी चूक आता होणार नाही
खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांनी २०२४च्या निवडणुकीत आम्ही कमी पडलो, याची कबुली दिली. संगमेश्वर तालुक्याने आमदार शेखर निकम यांना विजयी केले म्हणून आम्ही चिपळूणमध्ये फटाके फोडू शकलो; मात्र यापुढे आम्ही गाफील राहणार नाही. मागच्या निवडणुकीपूर्वी किटल्या, छत्र्या वाटणारे, मुंबई-पुण्यातील कोकणवासियांना बसेस देणारे लोक या वेळी कुठे होते, असा सवाल करत त्यांनी आमदार निकम म्हणजे विकासाचे दुसरे नाव असल्याचे ठामपणे सांगितले.