बांदा-मोर्येवाडा परिसर चकाचक
swt642.jpg
96917
बांदा ः मोर्येवाडा येथे स्वच्छता करून कचराकुंड्या ठेवण्यात आल्या.
बांदा-मोर्येवाडा
परिसर चकाचक
बांदाः बांदा-मोर्येवाडा परिसरात काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी तातडीने पुढाकार घेत कचरा हटविण्याची मोहीम राबवली. त्या ठिकाणी साचलेला सर्व कचरा साफ करण्यात आला असून परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला आहे. यावेळी खतीब यांनी, गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सर्वांनी कचरा रस्त्यावर न टाकता ग्रामपंचायतीने दिलेल्या कचरा कुंडीतच टाकावा, असे आवाहन केले. ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेचे स्वागत करत खतीब यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.
-----------
swt643.jpg
96918
पौर्णिमा केरकर
सावंतवाडीत शनिवारी
केरकर यांचे व्याख्यान
सावंतवाडीः श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन यांच्यावतीने (कै.) विजयश्री जयानंद मठकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता गोव्यातील लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. ‘कोकण व गोमंतकाच्या लोकसाहित्यातील स्त्री जीवन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उषा परब आहेत. विजयश्री मठकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ दरवर्षी महिला व मुलांसंदर्भात प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये स्त्रिया व बालकांचे आरोग्य, कायदे, विविध समस्या, कौटुंबिक जीवन अशा विविध विषयांवर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. पौर्णिमा केरकर यांच्या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.