पान एक-''ओंकार''ला पकडण्यासाठी मोहीम हाती

पान एक-''ओंकार''ला पकडण्यासाठी मोहीम हाती

Published on

९६९३९

‘ओंकार’ला पकडण्यासाठी मोहीम
पथक करतेय हालचालींचा अभ्यास ः लवकरच रेस्क्यू पथक दाखल होणार
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी, ता. ६ ः गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर काही दिवसांपासून बागायतीचे नुकसान करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीची पकड मोहीम (रेस्क्यू ऑपरेशन) वनविभागाच्या खास पथकाने हाती घेतले आहे. तशा प्रकारची परवानगीही सिंधुदुर्ग वन विभागाला मिळाली आहे. रेस्क्यू पथक ओंकारच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. लवकरच त्याला रेस्क्यू करण्यात येईल, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिली.
दोडामार्गमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीच्या कळपापैकी ओंकार हत्ती हा सध्या सावंतवाडी तालुक्यातील कास, सातोसे गावांमध्ये स्थिरावला आहे. अलीकडेच तो सिंधुदुर्गच्या सीमेवरील गोवा राज्यातील काही भागांमध्ये पोहोचला होता. तेथून त्याने पुन्हा एकदा सावंतवाडीतील कास गावामध्ये मुक्काम ठोकला आहे. कास गावामध्ये शेती, तसेच बागायतींचे नुकसान करत आहे. वन विभागाचे एक पथक त्याच्या मागावर दिवसरात्र असून, त्याच्या एकूणच हालचालींचा अभ्यास या टीमकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या संदर्भात उपवनसंरक्षक शर्मा म्हणाले, ‘‘ओंकार हत्तीला रेस्क्यू करण्यासंदर्भातील परवानगी मिळाली आहे. रेस्क्यू करण्यासाठी ओंकार हत्तीच्या एकूणच हालचालींवर बारीक लक्ष ठेवून तशा प्रकारचा अभ्यास केला जाणार आहे. म्हणजेच त्याचा स्वभाव, रागीटपणा, रेस्क्यू करण्यासाठी आवश्यक जागा अशा ठिकाणांची माहितीबाबत रेस्क्यू टीमकडून अभ्यास केला जात आहे. विशेष म्हणजे वनताराची काही माणसेही सिंधुदुर्गात दाखल झाली आहेत. ती सध्या दोडामार्ग तालुक्यामध्ये असून, त्यांच्याकडूनही काही इनपुट्स आदी संदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कर्नाटक वन विभागालाही मदतीसाठी पत्र पाठवले असून, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्राणी रेस्क्यू करणाऱ्या विविध टीमची मदतही यात घेण्यात येणार आहे.’’
दरम्यान, ''ओंकार'' हत्तीचे वय सुमारे १० वर्षे असून तो अधिक आक्रमक नाही. मात्र, त्याच्याकडून शेतीत होणारे नुकसान पाहता त्याला लवकरच रेस्क्यू करण्यात येणार आहे. ही मोहीम आत्तापासूनच सुरू केली असून पुणे विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी अभ्यास करत आहे. संधी मिळताच लवकरच ओंकार हत्तीला रेस्क्यू करून त्याला सुरक्षित स्थळी देण्यात येणार आहे.’’


कोट
ओंकार हत्तीला बेशुद्ध करून सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यासाठी काही ठिकाणांची निश्चिती केली आहे. महाराष्ट्र वन विभागाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी थेट हत्तीसमोर जाऊ नये. तो कुठेही दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे, वन विभाग तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे.
- मिलीश शर्मा, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com