संस्कारी स्त्री समाजासाठी दिशादर्शक

संस्कारी स्त्री समाजासाठी दिशादर्शक

Published on

97071

संस्कारी स्त्री समाजासाठी दिशादर्शक

डॉ. राहुल पंतवालावलकर ः वायरी येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : स्वयंपाकघरामध्ये आपल्या कुटुंबाचे हित दडलेले आहे. आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये त्यांच्या वयाचा ७ ते १३ या वर्षांतील काळ महत्त्वाचा आहे. मुले अनुकरणाने शिकत असतात. शिस्त आणि स्वातंत्र्य हे मुलांच्या शिकवणीत महत्त्वाचे आहे. पालकांनी सजग होणे आवश्यक आहे. ‘सातच्या आत घरात’ ही आपल्या पूर्वजांची शिकवण आपण विसरत आहोत. संस्कारी स्त्रियाच संस्कारी समाज निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन डॉ. राहुल पंतवालावलकर यांनी येथे केले.
मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे वायरी भूतनाथ येथे नवदुर्गा पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फाउंडेशनतर्फे नवरात्रोत्सवात नऊ दिवस सत्कार केलेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचे पूजन केले. तसेच विधवांचा साडी-चोळी व नारळाने ओटी भरून सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर सानिका केअर सेंटरच्या सानिका तुळसकर, ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित, माजी नगरसेवक महेश कांदळगावकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे, प्रा. रामचंद्र काटकर, पर्यटन व्यावसायिक बाबू बिरमोळे, वायरी भूतनाथच्या उपसरपंच प्राची माणगावकर, संदीप बोडवे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. पंतवालावकर यांनी, कुटुंब व्यवस्था तसेच संस्कार, आरोग्य, आहार आणि व्यसनाधिनतेवर मार्गदर्शन केले. सौ. तुळसकर यांनी, गरजू व्यक्तींची शुश्रुषा करण्यासाठी माझ्या वडिलांनी आणि बहिणींनी मला जो पाठिंबा दिला, त्यामुळे समाजसेवेच्या क्षेत्रात आले. यात माझ्या पतीनी मोलाची साथ दिली. सानिका केअर टेकर सेंटर आज समर्थपणे रुग्णसेवा करत आहे, असे सांगितले.
वैशाली पंडित यांनी, आजच्या मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे, असे सांगितले. महेश कांदळगावकर यांनी जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणे हे मातृत्व आधार फाउंडेशनचे काम आहे. समाजाची नि:स्वार्थपणे सेवा करणे हे मातृत्वाचे व्रत आहे, असे सांगितले. संस्थापक संतोष लुडबे यांचे कार्य शब्दांपलीकडचे आहे, असे सांगितले. मनोज खोबरेकर, स्मृती कांदळगावकर, दादा वेंगुर्लेकर, उमा लुडबे, संदीप बोडवे, दीक्षा लुडबे, प्रवीण लुडबे, विजय तळगावकर आदी उपस्थित होते. संतोष लुडबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com