त्या वकीलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
- rat७p१५.jpg-
P२५N९७११३
लांजा ः सरन्यायाधीश यांच्याविरूद्ध निंदनीय कृत्य करणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल करा, या मागणीचे निवेदन देताना लांजा तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, उपाध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह अन्य सदस्य.
‘त्या’ वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
लांजा बौद्धजन संघाची मागणी ; तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ७ ः भारताच्या सरन्यायाधिशांच्या दिशेने बूट फेकणारे वकीलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लांजा तालुका बौद्धजन संघातर्फे करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले.
लांजा तालुका बौद्धजन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन दिले. सोमवारी (ता. ६) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधिशांसमोर सुनावणी चालू असताना एका वकिलाने पायातील बूट काढून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले; हा भ्याड प्रयत्न आहे, असे बौद्धजन संघाचे म्हणणे आहे. तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन देताना लांजा तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, उपाध्यक्ष आनंद कांबळे, सरचिटणीस उज्ज्वल पवार, संतोष पवार, जितेंद्र यादव, सुनील कांबळे, गौतम सावंत, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.