एसआयएलसी कोल्हापूर २

एसआयएलसी कोल्हापूर २

Published on

एसआयएलसी कोल्हापूर २
००००००००००००

बांधकाम प्रकल्प व्यवस्थापनात करिअरच्या संधी

सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्ट विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा

कोल्हापूर, ता. ७ ः बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन अर्थात कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील महत्त्वाचा भाग आहे; परंतु आज एकीकडे पदवी शिक्षणात हा विषय शिकविताना अनेक कौशल्यांचा जसे की प्रात्यक्षिके, सॉफ्टवेअर, सॉफ्ट स्किल्स, बांधकाम प्रकल्पात काम करण्यासाठी आवश्यक व्यक्तिगत कौशल्ये आणि साईटवरील मनुष्यबळाचा योग्य वापर कसा करावा इ.घटकांचा अभाव दिसतो. दुसरीकडे वरील सर्व कौशल्यांत पारंगत अशा बहुकुशल सिव्हिल इंजिनिअर्स व आर्किटेक्टसना देशांत व परदेशात वाढती मागणी आहे. याविषयीचे शिक्षण व नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन करणारी विशेष कार्यशाळा येत्या शनिवारी (ता. ११) कोल्हापूर सकाळ कार्यालयात सकाळ संलग्न नामांकित कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसीतर्फे आयोजित केली आहे.
बांधकाम क्षेत्रातील नामवंत उद्योग कंपन्या जसे की ऍफकॉन्स, टाटा प्रोजेक्ट्स, स्टॅनटेक, कोलिअर्स इंटरनॅशनल, कुश्मन वेकफिल्ड, शापुरजी पालनजी, गोदरेज प्रॉपर्टीज इ. मध्ये विविध पदांवर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. या उद्योगांच्या विद्यार्थ्यांकडून नेमक्या काय अपेक्षा असतात, विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीअल व रिअल इस्टेट या क्षेत्रात देशविदेशात नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, याविषयी बांधकाम प्रकल्प व्यवस्थापनातील अनुभवी तज्ज्ञ डॉ. विकास पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणी आवश्यक, नोंदणीसाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून इन्क्वायरी फॉर्म भरावा.

क्यू आर कोड घेणे- 97167

चौकट करावी

कार्यशाळा ः शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५
वेळ ः सकाळी ११.३० ते दुपारी २.३०
ठिकाण ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
नोंदणीसाठी संपर्क ः ७७२००७५७६२ किंवा ७७५८८२५७३७

Marathi News Esakal
www.esakal.com