कलमठ ग्रामपंचायतीत 
‘एआय’चे प्रशिक्षण

कलमठ ग्रामपंचायतीत ‘एआय’चे प्रशिक्षण

Published on

कलमठ ग्रामपंचायतीत
‘एआय’चे प्रशिक्षण
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत असताना कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीत गावातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एआय प्रशिक्षणाचे झाले. यात ग्रामपंचायत अधिकारी महेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजात कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान एआय म्हणजे काय, त्याची कार्यपद्धती, उपयोगक्षेत्र, फायदे, मर्यादा आणि शासनातील विविध कामांमध्ये त्याचा प्रभावी वापर कसा करता येईल याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगत, दैनंदिन कामकाजात एआयच्या माध्यमातून सुधारणा करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते प्रशिक्षक महेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, आशा व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
---
97131
लक्ष्मण कदम यांचा
सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडी ः गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आणि भारत गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रसाई कला, क्रीडा मंडळातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. रुग्णालय व इतर सामाजिक क्षेत्रांमध्ये कदम यांचे खूप मोठे योगदान आहे. कोणाच्याही मदतीला धावून जाणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. समाजामध्ये वावरत असताना आपले काम व कुटुंब सांभाळून ते समाजकार्यात सक्रीय आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
------
97178
गवई यांच्यावर
हल्ला करणाऱ्यावर
कारवाई करा ः कदम
कणकवली : लोकशाहीचा तिसरा मुख्य स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयात हल्ला करणाऱ्या वकिलाचा निषेध सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘‘लोकशाहीचा तिसरा मुख्य स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा एकाने प्रकार केला. या विकृत वकिलाची सनद रद्द करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या घटनेचा सर्वच स्तरावरून तसेच विरोधी पक्षाकडून निषेध व्यक्त होत असताना सत्ताधारी मात्र याबाबत चकार शब्द न काढता मुग गिळुन गप्प आहेत. ही फारच गंभीर बाब आहे.’’
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com