सावंतवाडीत २२ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
swt812.jpg
97285
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सावंतवाडीत २२ ऑक्टोबरला
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ः भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका न्यायालयीन कामकाजासाठी सावंतवाडी संस्थानात भेट दिली होती. या भेटीदरम्यान २२ ऑक्टोबर १९३२ ला राजापूर ते गोवा (पंचमहाल) हद्दीतील कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण सभा आयोजित केली होती. या ऐतिहासिक घटनेला यावर्षी ९३ वर्षे पूर्ण होत असल्याने त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीने जिल्हास्तरीय ‘स्मृती विचार संवर्धन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन केले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. लहान गट पाचवी ते सातवी, द्वितीय गट आठवी ते दहावी व महाविद्यालयीन गट (खुला गट) यांचा समावेश आहे. लहान गटासाठी अनुक्रमे १०००, ७०० व ५०० रुपये, द्वितीय गटासाठी १५००, १२०० व १००० रुपये, तर महाविद्यालयीन (खुला) गटासाठी २०००, १५०० व १००० रुपये तसेच सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
पहिल्या गटासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण, त्यांच्या जीवन चरित्रातून आज आपण काय शिकावे आणि विद्यार्थी बाबासाहेब (असे शिकले बाबासाहेब) हे विषय आहेत. दुसऱ्या गटासाठी सामाजिक न्यायासाठी बाबासाहेबांनी केलेला सत्याग्रह, त्यांनी बुद्ध, फुले आणि संत कबीर यांना गुरू का मानले आणि भारतीय संविधानाचे महत्त्व हे विषय, तर तिसऱ्या गटासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाती अंताविषयीचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांतिकारी लढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत स्त्रीमुक्ती चळवळ आणि त्यांची धम्मक्रांती व मुक्तीच्या प्रेरणा असे विषय ठेवण्यात आले आहेत. ही स्पर्धा २२ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान (समता प्रेरणाभूमी), जेल नजीक, सावंतवाडी येथे होणार आहे. स्पर्धा जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांसाठी खुली असून, नावनोंदणीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणीसाठी प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव, विठ्ठल कदम किंवा शांताराम असनकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मोहन जाधव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.